मुंबई : IMD महाराष्ट्रात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. पावसाचा जोर चांगलाच वाढल्याचे चित्र असून राज्यातील काही जिल्ह्यांत आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून (IMD) देण्यात आला आहे. चला तर मग याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सातारा, अमरावती, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे.
IMD : जळगाव जिल्ह्यासह या जिल्ह्यांना यलो अलर्ट
राज्यात मान्सूनचा जोर वाढला असून जळगावात आज सकाळपासून काही ठिकाणी जोरदार ते हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरु आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, यवतमाळ, नांदेड, वर्धा, नागपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून यलो अलर्ट देण्यात आला असून याठिकाणी मुसळधार ते जोरदार पावसाचा अंदाज आहे.