देशातील करोडो शेतकरी PM किसान सन्मान निधीच्या 17 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यांच्यासाठी ही चांगली बातमी आहे. PM किसान योजनेचा 17 वा हप्ता मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे.
PM किसान सन्मान निधी योजना 24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू झाली. मोदी सरकार पीएम किसान योजनेंतर्गत जमीनधारक शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात दरवर्षी 6 हजार रुपये हस्तांतरित करते. ही रक्कम प्रत्येकी 2 हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये दिली जाते. त्यामुळं शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारा खर्च भागवण्यास मदत होते. योजनेचा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो.
पीएम किसानचा 17 वा हप्ता कधी येणार ? या व्हिडिओमध्ये पहा संपूर्ण माहिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 फेब्रुवारी 2024 रोजी योजनेचा 16 वा हप्ता जारी केला होता. या हप्त्यात, 9 कोटींहून अधिक लाभार्थी शेतकऱ्यांना 21 हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम जारी केली गेली. चालू आर्थिक वर्ष 2024-25 चा पहिला हप्ता आता जारी केला जाणार आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तो रिलीज होऊ शकतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी पूर्ण करणं आवश्यक आहे. त्यासाठी लाभार्थ्यांनी यादीत आपलं नाव तपासून घ्यावं.
अशी तपासा लाभार्थी स्थिती
सर्वात आधी तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
येथे सर्वप्रथम होम पेजवर उपलब्ध असलेल्या ‘तुमची स्थिती जाणून घ्या’ या पर्यायावर तुम्हाला क्लिक करावे लागेल
यानंतर तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक, मोबाईल क्रमांक, आधार कार्ड, कॅपच्या कोड आणि ओटीपी प्रविष्ट करायचाय.
ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनाअंतर्गत तुमची लाभार्थी स्थिती दिसेल.
अशी तपासा लाभार्थ्यांची यादी
पीएम किसान या अधिकृत संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर मुख्यपृष्ठावरील ‘शेतकरी कॉर्नर’ विभागात लाभार्थी यादी पर्यावर क्लिक करा.
यानंतर येथे काही पर्याय दिले जातील. यात तुम्हाला राज्य, जिल्हा, तपशील ब्लॉक आणि गाव निवडावे लागेल.
ही माहिती भरल्यानंतर ‘अहवाल मिळवा’ या पर्यायावर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला निवडलेल्या गावासाठी लाभार्थ्यांची यादी प्रदर्शित केली जाईल. या यादीत तुमचे नाव समाविष्ट आहे का ते तुम्ही तपासू शकतात.
या यादीत तुमचे नाव नसल्यास तुम्ही पीएम किसान हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधू शकता.