पुणे : कापसाला मागील महिन्यात चांगला भाव मिळत होता. यामुळे कापसाच्या भावात आणखीन वाढ होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, कापसाला सध्या 7000 ते 7500 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. चला तर मग जाणून घेऊया आजचे कापूस बाजारभाव..
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, कापसाला देउळगाव राजा या कृषी उत्पन्न बाजार समितीत जास्तीत जास्त दर हा 7750 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला तर सर्वसाधारण दर हा 7500 रुपये प्रतिक्विंटल मिळाला. तसेच कापसाची सर्वाधिक आवक ही हिंगणघाट बाजार समितीत झाली. येथे कापसाची आवक ही 3000 क्विंटल झाली तर कापसाला सर्वसाधारण दर हा 6500 रुपये प्रतिक्विंटल मिळाला.
सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)
बाजार समिती |
परिणाम |
आवक |
सर्वसाधारण दर |
कापूस (23/4/2024) |
|||
सावनेर | क्विंटल | 1500 | 7100 |
राळेगाव | क्विंटल | 2000 | 7500 |
मारेगाव | क्विंटल | 502 | 7050 |
पारशिवनी | क्विंटल | 291 | 7000 |
देउळगाव राजा | क्विंटल | 317 | 7500 |
हिंगणघाट | क्विंटल | 3000 | 6500 |
सूचना :- बाजार समितीतील आवकनुसार दरात बदल होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समिती व व्यापाऱ्यांशी संपर्क साधूनच शहानिशा करावी. याचा ॲग्रोवर्ल्डशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नसेल.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- “धानुका”ने लॉन्च केले नवे कीटनाशक आणि बायो-फर्टिलाइजर
- आयएमडीचा पावसाचा इशारा; मात्र सध्या अलर्ट स्थिती नाही