जम्मू आणि काश्मीरमधील कृषी विद्यापीठं शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांच्या प्रचार-प्रसारात, तसंच ब्रँड तयार करण्यात मदत करत आहेत. या केंद्रशासित प्रदेशातील शेर-ए-काश्मीर कृषी विज्ञान आणि कृषी तंत्रज्ञान विद्यापीठांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे.
काश्मीर खोऱ्यातील कृषी क्षेत्रात क्रांती आणण्यासाठी आणि इथल्या शेतकरी समुदायाच्या उन्नतीसाठी, महत्त्वपूर्ण प्रयत्न सुरू आहेत. फलोत्पादन, नियोजन आणि विपणन विभागाच्या सहकार्याने दोन कृषी ब्रँडिंग केंद्र म्हणजेच ABC स्थापन केली गेली आहेत.
केवळ पायाभूत सुविधांच्या पलीकडे, ही केंद्रे शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी उत्पादनांचं ब्रँडिंग आणि मार्केटिंग करण्याच्या जटिल प्रक्रियेत मार्गदर्शन करत आहेत. त्यासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था, IIT आणि भारतीय व्यवस्थापन संस्था, IIM यांचे तज्ञ मार्गदर्शन करत आहेत.
स्थानिक शेतकऱ्यांना सक्षम बनवण्यासाठी, त्यांच्या उत्पादनांना ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारची व्यापक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी कृषी विद्यापीठं प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर उतरली आहेत. संपूर्ण काश्मीर खोऱ्यात व्यापक सर्वेक्षण केलं जातं आहे. शेतकऱ्यांसाठी जागरुकता कार्यक्रम राबविले जात आहेत. कृषी मालाची गुणवत्ता सुधारण्यावर भर दिला जात आहे.
वैयक्तिक शेतकऱ्यांच्या पलीकडे शेतकरी उत्पादक संस्थां, FPOs स्थापन केल्या जात आहेत. कृषी क्षेत्रातील हे नियोजन या काश्मिरच्या कृषी अर्थव्यवस्थेला निश्चितपणे चालना देईल, असा विश्वास सहयोगी प्राध्यापक डॉ. फरहत शाहीन यांनी व्यक्त केला आहे.
ॲग्रोवर्ल्ड ॲग्री न्यूज बुलेटिन
- काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे
- 20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल
- देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭
- शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस
- इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025 मध्ये ‘कॅन बायोसिस’ ला ज्युरी विशेष पुरस्कार