गुढीपाडव्याला लागणारे हार-कंगण, साखरगाठीचे भाव यंदा तेजीत

यंदा किरकोळ बाजारात साधारण साखरगाठींचा भाव 80 रुपये किलो आहे, तर शुभ्र साखरगाठींचा भाव 100 रुपये आहे. यंदा शेतमालाला पुरेसा भाव नसल्यानं बाजारात पैसा फिरत नाहीये. त्यामुळं होळीलाही साखरहारांची मागणी अत्यंत कमी होती.