गुढीपाडवा पंधरा दिवसांवर आला तरी राज्याच्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी सालगड्याची समस्या बिकट आहे. आता मोठे शेतकरी शेजारील राज्यात सालदारांचा शोध घेत आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे 15 ते 20 एकर तसंच त्याहून जास्त शेती आहे, त्यांना घरातील व्यक्तींवर अवलंबून राहून शेती करणं शक्य होत नाही. त्यासाठी बाहेरचा सालगडी ठेवावा लागतो.
गुढीपाडव्यापासून शेतकऱ्यांच्या नवीन वर्षाला प्रारंभ होतो. त्यामुळं या मुहूर्तावर नवीन सालदार ठेवण्याची अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. सध्या, वार्षिक सव्वा लाख रुपये देऊनही अनेकांना सालगडी मिळत नसल्याचं चित्र आहे. राज्यातील शेतकरी सालदाराच्या शोधात शेजारच्या मध्यप्रदेश, गुजरात, कर्नाटक, तेलंगणा राज्यापर्यंत जात आहेत, तर बाजूच्या राज्यातील शेतकरीही महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात सालगडी शोधत आहेत.
वर्षाचा पगार ॲडव्हान्स, तसंच सांगितल्याप्रमाणे धान्य, डाळी, प्रसंगी हातउसने पैसे देण्याची तयारी, एवढी मदत करुनही सालगडी संपूर्ण वर्षभर काम करेल की नाही, याची शाश्वती नाही. आधीच वाढलेला उत्पादन खर्च, मजूर टंचाई आणि उत्पादित शेतमालाला कमी भाव अशा अडचणींमुळे शेती परवडत नाही. त्यामुळे निम बटई पद्धतीनं सुद्धा कोणी शेती करण्यास तयार होत नाही. त्यामुळं शेती करणं कठीण झाल्याची प्रतिक्रीया शेतकरी व्यक्त करत आहेत.
- DAP Fertilizer : शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा: डीएपी खतांची किंमत कायम, अतिरिक्त अनुदानास मंजूरी !
- harbhara mar rog niyantran : हरभरा : मर रोग नियंत्रण
- Jivamrut kase banvave : घरच्याघरी जीवामृत तयार करायचेय ? ; मग ही सोपी पद्धत वाचाच !
- agriculture exhibition 2025 : कंपनी प्रतिनिधियों की प्रतिक्रिया उनकीही जुबानी
- शेतीला पूरक व्यवसायाची जोड देऊन केली आर्थिक प्रगती