अनेकांना वांगी खायला खूपच आवडते. विशेषतः वांग्याचे भरीत आणि भरलेली वांगी असली तर विशेषच नाही आणि भल्याभल्यांच्या तोंडाला पाणी आणतात. वांग्याची भाजी खाणारे शौकीन लोक आहेत. मात्र, याच वांग्यांमध्ये बिया जास्त निघाल्या तर त्याची चव बदलते.
आपण बाजारातून वांगी आणतो. मात्र, बऱ्याचदा या वांग्यांमध्ये बिया जास्त निघतात. अनेक वेळा आपण वांग्यांचा रंग आकर्षक दिसला की ती वांगी घेतो. पण जेव्हा आपण ते वांग कापतो त्यात खूपच जास्त बिया असल्याचं दिसते. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकं वांगी घेताना ती कशी निवडायची ?, चला तर मग जाणून घेवूया एक खास ट्रिक..
वांगी कशी खरेदी करायची या संदर्भातला एक व्हिडिओ मास्टरशेफ पंकज भदोरिया यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवरील अकाउंटवर पोस्ट केला आहे. वांग खरेदी करण्यासाठी गेलेल्या महिलांसाठी ती उपयोगी ठरणार आहे.
या व्हिडिओमध्ये त्या सांगतात की, तुम्ही जेव्हा बाजारात वांगी विकत घ्यायला जाता तेव्हा ते वांग हातात उचलून पहायचं. जर ते वांग जड असेल तर ते घेऊ नका. आणि जे वांग थोडं हलक आहे ते वांग घ्या… कारण जड असलेल्या वांग्याला जास्त दिवस झालेले असतात. ते शीळ असतं आणि अशा वांग्यामध्ये बिया जास्त निघतात. यामुळे भाजी देखील चवदार लागत नाही. आणि जे वांग आकाराने लहान, थोडं हलकं असेल ते वांग ताज असतं. याची भाजी चवदार लागते. त्यामुळे आकाराने लहान आणि हलकं असलेली वांगे घेण्यास प्राधान्य द्यायला हवे.