• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

जैन कार्बन क्रेडीट योजनेत सहभागी व्हावे – अथांग जैन

_कार्बन क्रेडीट संदर्भात जैन हिल्स येथे भागधारक परामर्श बैठक उत्साहात_

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 23, 2024
in हॅपनिंग
0
जैन कार्बन क्रेडीट योजनेत सहभागी व्हावे – अथांग जैन

भागधारक परामर्श बैठकीच्या उद्घाटन प्रसंगी जैन फार्म फ्रेश फुडस् चे संचालक अथांग जैन, शेजारी श्री सायन शुगर फॅक्टरी सायन सुरतचे चेअरमन राकेश पटेल, धर्मेश पटेल, डॉ. गिरीश चौधरी आणि डॉ. बी डी जडे, डॉ. के.बी. पाटील

Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

जळगाव (प्रतिनिधी) ‘शेती करत असताना कार्बन उत्सर्जन कमी करून पर्यावरण संतुलन राखण्यात आपला महत्वपूर्ण सहभाग ठरतोच परंतु कार्बन क्रेडीटच्या रूपाने आर्थिक फायदा ही मिळवता येऊ शकतो यासाठी शेतकऱ्यांनी जैन कार्बन क्रेडीट योजनेत सहभागी व्हावे..’ असे आवाहन जैन फार्म फ्रेश फुडस् चे संचालक अथांग जैन यांनी केले.

भागधारक परामर्श बैठकीच्या उद्घाटन प्रसंगी जैन फार्म फ्रेश फुडस् चे संचालक अथांग जैन, शेजारी श्री सायन शुगर फॅक्टरी सायन सुरतचे चेअरमन राकेश पटेल, धर्मेश पटेल, डॉ. गिरीश चौधरी आणि डॉ. बी डी जडे, डॉ. के.बी. पाटील

जैन इरिगेशनचे हवामान स्मार्ट शेती आधारित हरित गृह वायू उत्सर्जन कमी करणे आणि मातीत सेंद्रीय कार्बन सुधारणेसाठी प्रकल्पसाठी भागधारक परामर्श बैठकीत त्यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी श्री सायन शुगर फॅक्टरी सायन सुरतचे चेअरमन राकेश पटेल, तेलबिया संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. डी. व्ही. दहात, स्मार्ट प्रोजेक्ट आत्मा सस्थेचे श्री जाधवर, श्रीकांत झांबरे, कापूस संशोधन केंद्राचे गिरीश चौधरी, क्लायमेट तज्ज्ञ आशिष सोनी, धर्मेश पटेल, जळगावचे कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. हेमंत बाहेती, यशदाच्या सौ. कल्पना पाटील, शुभांगी भोळे (नाशिक) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या शिवाय दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून जगभरातील या क्षेत्रातील व्यक्तींचा सहभाग होता. जळगाव पंचक्रोशीतील शेतकरी महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, आंध्र प्रदेश मधील शेतकरी सहभागी झाले होते. जैन इरिगेशचे सहकारी अतिन त्यागी यांनी सकाळ व दुपार सत्रातील बैठकीत कार्बन क्रेडीट प्रोजेक्ट बद्दल सादरीकरणाच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली. या बैठकीत मराठी, हिंदी, गुजराती, तेलगु व इंग्रजी इत्यादी भाषांतराची देखील व्यवस्था करण्यात आली होती.

कार्बन क्रेडिट : शेतकऱ्यांना मिळणार अतिरिक्त उत्पन्न

 

जैन इरिगेशन आणि जैन फार्म फ्रेश हा प्रकल्प ऐच्छिक कार्बन मार्केट स्टँडर्ड अंतर्गत विकसित करीत आहे. स्थानिक नागरिक, डीलर्स, पुरवठादार, शैक्षणिक संस्था, पर्यावरण आणि कृषी नियामक, स्वयंसेवी संस्था आणि इतरांची या सभेला उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. जनमेजय नेमाडे, डॉ. निर्मला झाला, डॉ. अनिल ढाके, डॉ. जयश्री राणे यांच्यासह जैन इरिगेशन आणि गांधी रिसर्च फाउंडेशनच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

टिश्यु कल्चर केळी लागवड कार्बन क्रेडीटसाठी मोलाची भूमिका – डॉ के. बी. पाटील

कार्बन क्रेडीट या विषयाच्या संदर्भात जैन इरिगेशनचे केळी तज्ज्ञ डॉ. के.बी. पाटील यांनी केळी पिकामुळे कार्बन उत्सर्जन कसे कमी करते याबाबत मार्गदर्शन करताना सांगितले की; जैन टिश्युकल्चर तंत्रज्ञानाने गत ३० वर्षात साध्य केले आहे. पूर्वी २० ते २२ महिने केळीच्या पिकाला लागत होते त्यातून २५ टन प्रतिहेक्टर केळीचे उत्पादन होत होते. आज २० महिन्यात जैन टिश्युकल्चर केळीचे दोन पीक शेतकरी घेत आहेत त्यामुळे २० महिन्यात एका झाडापासून ५० किलो उत्पादन मिळत आहे. यासोबतच एका पिकातून एकरी १५० टन बायोमास म्हणजे दोन पिकातून ३०० टन बायोमास जमिनीत गाडला जातो त्यामुळे जमिनीचा ऑरगॅनीक कार्बन वाढतो त्याच सोबत पाण्याची ५६ टक्के ठिबक मुळे बचत होते. त्यामुळे विद्युत विजेची बचत झाली.त्यामुळे कार्बन उत्सर्जन कमी झाले; तसेच १२.५ कोटी जैन टिश्युकल्चर केळी रोपांची लागवड होत आहे त्यामुळे साधारण दरवर्षी ३३ हजार हेक्टर ग्रीन कव्हर निर्माण करीत आहे आणि वातावरण बदलावर मात करण्यासाठी काम करीत आहे. ‘लीव्ह धीस वर्ल्ड बेटर दॅन यू फाउंड इट’ या मिशन प्रमाणे सृष्टी सांभाळण्या साठी केळी पीक महत्त्वाची भूमिका बजावत आहे..

Nirmal Seeds

कार्बन क्रेडीट प्रकल्प शेतकरी आणि पर्यावरण ह्यांना लाभदायी – डाॅ. बी.डी. जडे

ठिबक सिंचन हे पिकांना पाणी देण्याचे अथवा सिंचनाचे साधन नसून पाणी वापरात बचत बरोबरच पिकांचे उत्पादन वाढीकरिता तसेच या तंत्रज्ञानामुळे विजेची ३३ टक्के बचत होते. तसेच रासायनिक खताच्या वापरामध्ये ही ३० टक्के बचत होते. जैन इरिगेशनच्या पुढाकारामुळे ऊस, कापूस या पिकांमध्ये ठिबक सिंचन तंत्राचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. सर्व पिकांमध्ये राज्यात कापूस पिकाकरिता ठिबक सिंचनाचा सर्वात अधिक वापर होत आहे. ऊस पिकाकरिता खूप पाणी लागते हा गैरसमज शेतकऱ्यांमध्ये आहे. वनस्पती शास्त्रमध्ये ऊस हे पिक ‘सी-४’ वर्गात मोडते या पिकास अधिक पाण्यापेक्षा अधिक सूर्यप्रकाशाची गरज असते. म्हणून ऊसाच्या दोन ओळीत ५ ते ६ फूट अंतर ठेवावे. ऊसाकरिता ठिबक सिंचन वापर केल्याने उसाचे एकरी १०० टनाहून अधिक उत्पादन शेतकरी घेत आहे. जैन इरिगेशन आता ऊसाचे एकरी २०० टन घेण्याकरिता प्रयत्नशील आहे. ऊसामध्ये ठिबक तंत्राचा वापर केल्याने साखर उतारा सुद्धा वाढतो. त्यामुळे मोकळे पाणी देतांना अधिक जास्त वेळ पंप सुरु ठेवावा लागतो. त्यामुळे विजेचा वापर जास्त होतो ठिबक मुळे विजेची ३३ टक्के रासायनिक खताच्या वापरामध्ये ३० टक्के तसेच पाणी वापरामध्ये ५० ते ६० टक्के बचत होते. त्यामुळे कार्बनडाय ऑक्साईट वातावरणात सोडण्याचे प्रमाण कमी होते, कार्बन क्रेडीट जास्त मिळतील त्यामुळे कार्बन क्रेडीट प्रकल्प शेतकऱ्यांना आणि पर्यावरणाकरिता लाभदायी ठरणार आहे. या बैठकीचे सूत्रसंचालन अतिन त्यागी यांनी तर सकाळ सत्राचे डॉ. नेमाडे यांनी व किशोर कुळकर्णी यांनी दुपार सत्राचे आभारप्रदर्शन केले.

Ajeet Seeds

तुम्हालाही वाचायला नक्की आवडेल. 

  • वाग्यांमध्ये बिया आहेत की नाहीत ? कसं ओळखाल ; मग ही खास ट्रिक तुमच्यासाठी
  • ॲग्री स्टार्ट अपला नाबार्डकडून 1000 कोटींचा निधी

 

 

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: अथांग जैनजैन इरिगेशनजैन कार्बन क्रेडिट
Previous Post

वाग्यांमध्ये बिया आहेत की नाहीत ? कसं ओळखाल ; मग ही खास ट्रिक तुमच्यासाठी

Next Post

फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन करीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

Next Post
फार्मर प्रोड्युसर कंपनी

फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन करीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

ताज्या बातम्या

आजपासून राज्यात 3 दिवस धुमशान

आजपासून राज्यात 3 दिवस धुमशान

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 4, 2026
0

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी: शेतीकामासाठी माती-मुरूम वापरण्यावरील ‘रॉयल्टी’ माफ; पोलिसांचा ससेमिराही टळणार!

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी: शेतीकामासाठी माती-मुरूम वापरण्यावरील ‘रॉयल्टी’ माफ; पोलिसांचा ससेमिराही टळणार!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2026
0

भूमीहीन महिलांनाही मिळणार ‘शेतकरी’ दर्जा

भूमीहीन महिलांनाही मिळणार ‘शेतकरी’ दर्जा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2026
0

देशभरात मान्सूनचा जोर; 15 राज्यात पावसाचा धुमाकूळ, महाराष्ट्रात रेड अलर्ट!

देशभरात मान्सूनचा जोर; 15 राज्यात पावसाचा धुमाकूळ, महाराष्ट्रात रेड अलर्ट!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2026
0

आता आठवडाभर राज्यात पावसाचा जोर

आता आठवडाभर राज्यात पावसाचा जोर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 1, 2026
0

कमी दाबाचा पट्टा सक्रिय; आजपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढणार

कमी दाबाचा पट्टा सक्रिय; आजपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 29, 2026
0

राज्यात आजपासून तीन दिवस पावसाचे..; 23 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

राज्यात आजपासून तीन दिवस पावसाचे..; 23 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2026
0

राज्यात पावसाचा जोर वाढणार..

राज्यात पावसाचा जोर वाढणार..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2026
0

मान्सून 2/3 दिवसात पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता

मान्सून 2/3 दिवसात पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 20, 2026
0

मान्सूनच्या वाटचालीस अनुकूल बदलांची चिन्हे; 20 जूननंतर शेतकऱ्यांसाठी येणार खुशखबर!

मान्सूनच्या वाटचालीस अनुकूल बदलांची चिन्हे; 20 जूननंतर शेतकऱ्यांसाठी येणार खुशखबर!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

आजपासून राज्यात 3 दिवस धुमशान

आजपासून राज्यात 3 दिवस धुमशान

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 4, 2026
0

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी: शेतीकामासाठी माती-मुरूम वापरण्यावरील ‘रॉयल्टी’ माफ; पोलिसांचा ससेमिराही टळणार!

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी: शेतीकामासाठी माती-मुरूम वापरण्यावरील ‘रॉयल्टी’ माफ; पोलिसांचा ससेमिराही टळणार!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2026
0

भूमीहीन महिलांनाही मिळणार ‘शेतकरी’ दर्जा

भूमीहीन महिलांनाही मिळणार ‘शेतकरी’ दर्जा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2026
0

देशभरात मान्सूनचा जोर; 15 राज्यात पावसाचा धुमाकूळ, महाराष्ट्रात रेड अलर्ट!

देशभरात मान्सूनचा जोर; 15 राज्यात पावसाचा धुमाकूळ, महाराष्ट्रात रेड अलर्ट!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish