नवी दिल्ली : नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट म्हणजेच नाबार्ड लवकरच ॲग्री स्टार्ट अपसाठी 1000 कोटींचा मिश्रित निधी सुरू करणार आहे. याशिवाय, नाविन्यपूर्ण कल्पनांना चालना देण्यासाठी प्री-सीड स्टार्ट अपमध्ये गुंतवणुकीसाठी 750 कोटी राखून ठेवले जाणार आहेत, नाबार्डचे अध्यक्ष शाजी केव्ही यांनी ही माहिती दिली आहे.
या निधीतून ग्रामीण इकोसिस्टममध्ये नवीन फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेज तयार करण्यास मदत होईल. सध्या इक्विटी आणि डेट इन्स्ट्रुमेंट्सच्या मर्यादित प्रवेशामुळे ॲग्री स्टार्ट अप ऑपरेशन्स वाढवण्याच्या आव्हानांना तोंड देत आहेत. अशा स्टार्ट अपना पूरक ऑपरेशन्समध्ये नाबार्ड फंड गुंतवणूक करेल. त्यामुळं तंत्रज्ञानावर आधारित ॲग्री स्टार्ट अप आणि ग्रामीण उपक्रमांना चालना मिळेल.
नॅबव्हेंचर्सद्वारे केले जाईल व्यवस्थापन
कृषी-आधारित ॲग्री स्टार्ट अप आणि ग्रामीण उपक्रमांना वित्तपुरवठा करण्यासाठी, मिश्रित भांडवली सहाय्य कृषी मंत्रालयाद्वारे आणले जाईल. नाबार्डच्या संपूर्ण मालकीची उपकंपनी, नॅबव्हेंचर्सद्वारे (Nabventures) त्याचे व्यवस्थापन केले जाईल. ॲग्रीटेक, पशुपालन, मत्स्यपालन, अन्न प्रक्रिया आणि जैवतंत्रज्ञान अंतर्गत येणाऱ्या स्टार्ट अपना त्याचा फायदा होईल.
‘इनोव्हेशन अँड ॲग्री-एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट’
केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत 2018-19 पासून नवोन्मेष आणि कृषी-उद्योजकतेला चालना देण्याच्या उद्देशाने ‘इनोव्हेशन अँड ॲग्री-एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट’ कार्यक्रम राबवला जात आहे. देशातील स्टार्ट अप इकोसिस्टमचं पालनपोषण करण्यासाठी आर्थिक आणि तांत्रिक सहाय्य देऊन नाविन्यपूर्ण कृषी-उद्योजकतेला चालना देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.
ॲग्री स्टार्ट अपला 111 कोटींची मदत
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2022-23 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात नाबार्डच्या माध्यमातून को-इन्व्हेस्टमेंट मॉडेल अंतर्गत उभारलेल्या मिश्र भांडवलासह निधीची घोषणा केली होती. सरकारी आकडेवारीनुसार, कृषी आणि संलग्न क्षेत्रातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या नेतृत्वाखालील 387 स्टार्ट अपसह एकूण 1554 ॲग्री स्टार्ट अपला 111 कोटी रुपयांची मदत आतापर्यंत करण्यात आली आहे.
ॲग्री स्टार्ट अपला मदतीसाठी इतर सरकारी योजना
1. डिजिटल ॲग्रीकल्चर मिशन (डॅम), 2021.
2. राष्ट्रीय कृषी विकास योजना (RKVY) अंतर्गत नवोपक्रम आणि कृषी-उद्योजकता विकास कार्यक्रम
3. ॲग्री स्टार्ट अपसाठी प्राधान्य कर्ज.
4. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (DST) अंतर्गत निधी बीज समर्थन कार्यक्रम (NIDHI-SSP).