मुंबई : अनेक वेळा वातावरणातील बदलामुळे शेतातील पिकाचे नुकसान होते. याचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भार सहन करावा लागतो. यासाठीच शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने किसान क्रेडिट कार्ड ही योजना सुरु केली आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना स्वतंत्र कर्ज देता येईल. या योजनेचा तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल तर किसान क्रेडिट कार्डसाठीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
ही योजना राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (National Bank for Agriculture and Rural Development)द्वारे सुरु केली होती. तसेच शेतकऱ्यांना या योजनेत किसान क्रेडिट कार्डसह बचत खातेही दिले जाते. या बरोबरच या योजनेच्या माध्यमातून अत्यल्प व्याजदरात शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज दिले जाते. पीएम किसान क्रेडिट कार्ड योजनेंतर्गत समाविष्ट असलेल्या शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज 4 टक्के व्याजदराने उपलब्ध करून दिले जाते.
ही आहे किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्याची पद्धत
सर्वप्रथम तुम्हाला योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर ( http://pmkisan.gov.in ) वर जावे लागेल.
येथे तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड फॉर्म डाउनलोड करावा लागेल.
या फॉर्म मध्ये तुम्हाला जमिनीच्या नोंदी आणि पेरणी केलेली पिके यासारखी महत्त्वाची माहिती भरावी लागेल.
कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) येथे फॉर्म भरा आणि सबमिट करा.
शेतकऱ्यांना योजनेअंतर्गत कर्ज देण्याचे निर्देश केंद्र सरकारने बँकांना दिले आहेत.
किसान क्रेडिट कार्डसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
बँकेने जारी केलेला अर्ज
अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
अर्जदाराचे मूळ रहिवासी प्रमाणपत्र
आधार कार्डची प्रत
पॅन कार्डची प्रत
अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याचा जमिनीचा कागद
अधिक माहितीसाठी तुम्ही शेतकरी हेल्पलाइन क्रमांक 155261/011-24300606 वर कॉल करू शकता.