मुंबई : कृषी क्षेत्रासाठी महत्त्वाचे योगदान देणारे हरितक्रांतीचे जनक, ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘एक्स’ म्हणजेच ट्विटरवर पोस्ट करून दिली आहे.
जगात भारत देश “कृषीप्रधान देश” म्हणून ओळखला जातो. देशातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करत असताना आपल्याला मनापासून आनंद होत असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. केंद्र सरकारकडून भारतरत्न पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्यासोबतच काँग्रेसचे नेते, देशाचे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव आणि माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांनाही मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अशी माहिती पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.
सुजलाम सुफलाम झालेल्या शहादा येथे ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन | Agroworld Expo 2024 |
स्वामीनाथन यांना हरितक्रांतीचे जनक म्हणून का ओळखले जाते?
एम. एस. स्वामीनाथन डॉक्टर व्हावे अशी त्यांच्या वडिलांची ईच्छा होती. मात्र त्यांनी कृषी क्षेत्रात संशोधन करण्याचे ठरवले. भारताला अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी बनण्यासाठी त्यांनी मोलाची भूमिका बजावली. भारतीय कृषी क्षेत्राला आधुनिक बनवण्यात देखील त्यांचा मोलाचा वाटा आहे. स्वामिनाथन यांनी सायटोजेनेटिक्स, आयनीकरण रेडिएशन आणि रेडिओसेन्सिटिव्हिटी यासारख्या क्षेत्रात बटाटा, गहू आणि तांदूळ संबंधित मूलभूत संशोधनाचे योगदान दिले. पर्यावरणीय हानीविना शाश्वत उत्पादकतेच्या व्याख्या त्यांनी जगासमोर ठेवल्या.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- राज्यात कापसाला काय मिळतोय भाव ? ; पहा आजचे कापूस बाजारभाव
- पीएम कुसुम सौर पंप योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरु ; जाणून घ्या संपूर्ण माहिती