• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

जगातील 5 सर्वात वजनदार फळे; गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुकात आहे नोंद!

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 29, 2024
in हॅपनिंग
0
जगातील 5 सर्वात वजनदार फळे; गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुकात आहे नोंद!
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

शेतीचा विकास झाल्यापासून गेल्या 10,000 वर्षांहून अधिक काळ मानव आकार, चव आणि उत्पादकता यासारख्या विशिष्ट वैशिष्ट्यांसाठी निवडकपणे पिकांची पैदास करत आहे. परिणामी, 21 व्या शतकातील आपली फळे आता पूर्वीपेक्षा अधिक वजनदार आणि मोठ्या आकाराची झाली आहेत. त्यातच अलीकडे काही वर्षांत सर्वाधिक वजनदार, आकारमानाने सर्वात मोठ्या फळांची उगवण करण्याकडे कल वाढतोय. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुकात नोंद झालेले सर्वसाधारण फळांपेक्षा जगातील 5 सर्वात वजनदार फळे आपण पाहूया.

स्ट्रॉबेरी
ही आहे 289 ग्रॅम वजनाची, जगातील सर्वात वजनदार स्ट्रॉबेरी! ती सरासरी गार्डन स्ट्रॉबेरीपेक्षा 20 पट जास्त वजनाची आहे. 2021 मध्ये चाही एरियल, इस्रायल यांनी हे उत्पादन घेतले. एरियल यांनी 2015 मध्ये जपानच्या कोजी नाकाओ यांनी साधलेला विक्रम मोडला. नाकाओ यांची स्ट्रॉबेरी 250 ग्रॅम वजनाची होती. एरियल यांनी उगवलेली स्ट्रॉबेरी इलान वाणाची आहे, जे वाण मोठी फळे देण्यासाठी ओळखले जाते. अनेक लहान स्ट्रॉबेरी एकत्र येऊन जणू एकच मोठी स्ट्रॉबेरी तयार केल्यासारखा हा विक्रम आहे. स्ट्रॉबेरीच्या हंगामात जानेवारीच्या उत्तरार्धात आणि फेब्रुवारीच्या सुरुवातीला वातावरण जितके थंड राहील, तितके फळ भरत जाते. स्ट्रॉबेरी फुलल्यापासून 45 दिवसांनंतर हळूहळू विकसित होते. पूर्ण पिकण्याच्या अवस्थेत तिचा आकार मोठा होतो, असे मूळ इलान स्ट्रॉबेरीची पैदास करणारे संशोधक डॉ. निर दाई यांनी सांगितले.

 

आंबा
सरासरी नवजात बाळापेक्षा वजनदार असा हा गुळगुळीत आंबा कोलंबियामधील गुयाटा येथे जर्मन ऑर्लँडो नोव्होआ बॅरेरा आणि रीना मारिया मॅरोक्विन या शेतकऱ्यांनी पिकवला. जुलै 2020 मध्ये त्यांनी 4.25 किलो वजनाचा आंबा पिकवून जागतिक विक्रम केला. त्यापूर्वी 2010 मध्ये फिलीपिन्समध्ये 3.43 किलोचा सर्वात वजनदार आंबा नोंद झाला होता. तसे सरासरी आंब्याचे वजन फक्त 100 ते 300 ग्रॅमपर्यंत असते.ज्या जमिनीवर प्रेमाने लागवड केली जाते, ती जमीन उत्तम फळे देते, असे विक्रमवीर बॅरेरा-मॅरोक्विन सांगतात.

 

वांगे
ब्रिटनमध्ये 2021 मध्ये पार पडलेल्या कॅना नॅशनल जायंट व्हेजिटेबल्स चॅम्पियनशिपमध्ये इतिहासातील सर्वात वजनदार वांग्याची नोंद झाली. पीटर ग्लेझब्रुक यांच्या बागेत हे वांगे वाढले. 3.12 किलोग्रॅम वजनाचे हे वांगे आहे. पीटरने आधीच्या रेकॉर्ड धारकापेक्षा 60 ग्रॅम जास्त वजनाचे वांगे उत्पादित केले. या यादीमध्ये वांग्याचा समावेश केल्याने तुम्हाला आश्चर्य वाटेल, परंतु जगाच्या अनेक भागात त्याला फळ मानले जाते. त्यात बिया असतात आणि फुलांच्या रोपापासून फळे वाढतात. ते केवळ एक फळच नाहीत तर वांग्याचे वनस्पतिशास्त्रीय दृष्ट्या बेरी म्हणून वर्गीकरण केले जाते. याचे कारण असे की वांगे हे एक अंडाशय असलेल्या एकाच फुलापासून विकसित होण्याच्या निकषांची पूर्तता करते.

भोपळा
कदाचित भोपळा हे आजच्या घडीला जगातील सर्वात वजनदार आणि आकारानेही सर्वात मोठे फळ असू शकेल, अगदी टरबुजापेक्षाही मोठे! मूळचे उत्तर अमेरिकेचे असलेले हे कुकुरबिटा मॅक्सिमा स्क्वॅशचे एक नारिंगी फळ आहे. आता तर अनेक शेतकरी अटलांटिक राक्षस भोपळा उगवतात. तथापि, जगातील सर्वात वजनदार भोपळ्याचा विक्रम इटलीच्या स्टेफानो कटुपी यांच्या नावावर आहे. त्यांनी 2021 मध्ये 1,226 किलो वजनाचा भोपळा उगवला. एखाद्या मारुती, ह्युंदाई आणि निसान मायक्रा कारपेक्षा हा भोपळा अधिक वजनदार आहे. जगातील आतापर्यंतच्या सर्वात वजनदार माणसाच्या वजनाच्या जवळपास तीनपट आहे . या आधीच्या चारही विक्रमी फळांचे वजन त्यांच्या सरासरी आकाराच्या फळांपेक्षा 10 ते 20 पट जास्त होते. स्टेफानोच्या भोपळ्याचे वजन मात्र सामान्य भोपळा फळांपेक्षा 100 पट जास्त होते. भोपळ्याचे विक्रमी वजन वाढतच चालले आहे.

1955 मध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या पहिल्याच आवृत्तीत, 41.7 किलो वजनाचा भोपळा हेच सर्वाधिक वजनदार फळ म्हणून विक्रम नोंदवला गेला होता. 1930 मध्ये ब्रिटनमधील पोर्ट टॅलबोट, ग्लॅमोर्गन येथे हा भोपळा उगवण्यात आला होता. शतकाच्या अखेरीस, भोपळ्याच्या वजनाचा जागतिक विक्रम 513 किलोवर पोहोचला होता. तेव्हापासून जवळजवळ प्रत्येक वर्षी भोपळ्याचा वजनाचा विक्रम खंडित झाल्यानंतर तो आता वर्तमान आकड्यापर्यंत पोहोचला आहे. आता असा प्रश्न निर्माण होतो, की भोपळा किती भारी असू शकतो? जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे यांत्रिक अभियंता डेव्हिड हू यांनी सांगितले, की भौमितीयदृष्ट्या परिपूर्ण भोपळा संभाव्यतः 9,071 किलोग्रॅम वजनापर्यंत पोहोचू शकतो, जरी प्रत्यक्षात तसे होण्याची आता अशात शक्यता दिसत नाही.

टरबूज
अमेरिकेतील ख्रिस केंट म्हणजे एक टरबूजवेडी व्यक्ती. त्यांना खरबूज तर फारच आवडतात आवडतात. त्यांनी 2010 मध्ये पहिल्यांदा जगातील सर्वात वजनदार टरबूजचा विक्रम साधला. त्यानंतर 2013 मध्ये ख्रिस यांनी त्यापेक्षा मोठा टरबूज वाढवून आपलाच विक्रम मोडून एक नवा विक्रम प्रस्थापित केला, जो आजही कायम आहे. तब्बल 159 किलोग्रॅम वजनाचे टरबूज या बहाद्दराने उत्पादित केले. हे टरबूज सरासरीपेक्षा 15 पट जास्त वजनदार ठरले. त्यापूर्वीच त्यांचाच विक्रम 19.2 किलोग्रॅम वजनाचा होता. ख्रिसने स्वत:च आधी पिकविलेल्या टरबुजांच्या 291 केंटने आणि 274 केंट या दोन वाणांच्या संकरातून महाकाय विक्रमी टरबूज उत्पादित केले. या रेकॉर्ड-सेटिंग टरबुजाचे बियाणेही त्याला बक्कळ पैसा कमावून देते. फक्त तीन किंवा चार बियांच्या लहान पॅकसाठी त्याला 40 अमेरिकी डॉलर्स म्हणजे 3,300 भारतीय रुपयांपर्यंत रक्कम मिळते.

Ajeet Seeds

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • सध्या कापसाला असा मिळतोय दर
  • शेतीसाठी शासकीय योजना : औषधी वनस्पती लागवड

Share this:

  • Facebook
  • X
Tags: गिनीज वर्ल्ड रेकॉर्डवजनदार फळेस्ट्रॉबेरी
Previous Post

सध्या कापसाला असा मिळतोय दर

Next Post

कांद्याला आज काय भाव मिळाला ? ; वाचा बाजारभाव

Next Post
कांद्याला आज काय भाव मिळाला ? ; वाचा बाजारभाव

कांद्याला आज काय भाव मिळाला ? ; वाचा बाजारभाव

ताज्या बातम्या

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

काय..? तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2025
0

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 23, 2025
0

व्हिएतनाम

व्हिएतनामींचा योगगुरू बनलाय साताऱ्यातील शेतकरीपुत्र?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 21, 2025
0

AI

500 कोटींच्या AI शेती धोरणाचा फायदा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 19, 2025
0

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

महाॲग्री- एआय

महाॲग्री- एआय धोरण मंजूर ; 500 कोटींची तरतूद

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.