राज्याच्या बहुतांश भागात 26 व 27 नोव्हेंबर 2023 या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी बांधवांच्या शेतपिकांचे व मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश राज्याचे मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिले आहेत.
26 नोव्हेंबर व 27 नोव्हेंबर 2023 रोजी खान्देश, उत्तर महाराष्ट्रासह राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला आहे. या पावसामुळे शेतकरी बांधवांच्या शेतपिकांचे व अनुषंगिक मालमत्तेचे नुकसान झालेले आहे. संबंधित जिल्ह्यातील, संबंधित तालुक्यांचे तहसीलदार व तलाठी यांना नुकसानीचे पंचनामे तात्काळ करणेबाबत शासनाकडून निर्देश देण्यात आलेले आहेत.
ॲग्रोवर्ल्डचे 2024 मधील पहिले कृषी प्रदर्शन पिंपळगाव नगरीत.. । Agroworld Expo 2024।
मंत्री अनिल पाटील यासंदर्भात “ॲग्रोवर्ल्ड”शी बोलताना म्हणाले, “नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याची शासनाची नेहमीच भूमिका राहिली आहे, नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांनीही संबंधित तहसीलदार, तलाठी यांच्याशी संपर्क साधून तात्काळ आपापले पंचनामे करून घ्यावेत. यासंदर्भात काही अडचणी असल्यास आपल्या तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने कळवावे.”
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- पंजाबमधील शेतकऱ्यांचे पेन्शन, हमीभाव, कर्जमाफीच्या मागणीसाठी आंदोलन
- कापसाला या बाजार समितीत मिळतोय असा दर