पुणे विद्यापीठात कमवा आणि शिका योजनेअंतर्गत सेंद्रिय शेती अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. त्यातून विद्यार्थ्यांना सेंद्रिय बियाणांचा अभ्यास, लागवड, ठिबक सिंचन हे शिकवले जाईल, जेणेकरून कमी पाण्यात जास्त उत्पादन मिळेल. या अभ्यासक्रमात उत्पादन-विक्रीचे मॉडेल यावर भर दिला जाईल.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) कमवा आणि शिका योजनेअंतर्गत सेंद्रिय शेतीचे धडे देणार आहे. विद्यार्थ्यांना शेतीशी संबंधित उत्पादन, पॅकिंग आणि मार्केटिंग याविषयी माहिती दिली जाईल.
नाबार्डमार्फत पॉलिहाऊस उभारण्यासाठी अनुदान
विद्यापीठाने सेंद्रिय शेती प्रकल्पासाठी 50 लाख रुपयांची तरतूद केली आहे. कोर्ससाठी कॅम्पसमध्ये एक व्यवसाय मॉडेल तयार केले जाईल. नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (नाबार्ड) मार्फत विद्यार्थ्यांना पॉलिहाऊस उभारण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले जाईल. हा प्रकल्प टप्प्याटप्प्याने राबविला जाणार आहे.
उत्पादनाची कॅम्पसमध्येच केली जाणार विक्री
विद्यार्थ्यांना सेंद्रिय बियाणे अभ्यास, लागवड, ठिबक सिंचन, कमी पाण्यात जास्त उत्पादन आणि उत्पादन विक्रीचे मॉडेल शिकवले जाईल. विद्यापीठ कॅम्पसमध्येच विक्री करून शेतीतून उत्पन्न मिळविण्यासाठी योजना तयार केली जाईल. भविष्यात विद्यार्थ्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास मदत करणे हा प्रकल्पाचा उद्देश आहे.
विद्यापीठाने कमवा आणि शिका योजनेंतर्गत मिळणारे मानधन ₹ 55 ने वाढवले आहे. त्यातील ₹ 5 राज्य सरकारकडून दिले जाईल.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 👇
देशातील ई-मंडी कशा चालतात; शेतकऱ्यांना कसा होऊ शकतो या ऑनलाईन बाजाराचा फायदा?
शेतकऱ्याच्या मुलाचा वयाच्या बाराव्या वर्षीच आयआयटीत प्रवेश, आता अमेरिकेतून पीएचडी