कापूस भाव गेल्या वर्षी दहा हजारी पार होते. दिवाळीतही दर 8 हजारांच्या वरच राहिले होते. यंदा मात्र भारतासह जगभरात कापूस उत्पादन घसरलेले असूनही गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कापसाचे भाव कमी आहेत. सध्या सुताला जागतिक मागणी कमी असल्याने अतिरिक्त शिलकी साठा तयार होत आहे. अमेरिकी डॉलर्सच्या तुलनेत रुपया कमकुवत असल्यामुळेच सध्या कापसाचे दर 7 हजारांच्या पातळीवर टिकून आहेत. आता पुढे कापसाच्या दराची काय स्थिती आहे, ते आपण जाणून घेऊया.
यंदा कापसाची किमान आधारभूत किमत (MSP) ही ₹7,020 प्रती क्विंटल इतकी आहे. खुल्या बाजारातील चालू भाव हे त्यापेक्षा किंचित जास्त आहे. अजून चांगला भाव मिळेल या आशेने कापूस ठेवावा की आताच विकून मोकळे व्हावे, हा प्रश्न सध्या शेतकऱ्यांना सतावत आहे.
ॲग्रोवर्ल्डतर्फे सर्वांचे खूप खूप मनस्वी आभार
महाराष्ट्रात कापसाचा सरासरी भाव ₹7017.63/क्विंटल
सध्याच्या बाजारभावानुसार, महाराष्ट्रात कापसाची सरासरी किंमत ₹7017.63/क्विंटल आहे . सर्वात कमी बाजारभाव ₹6720/क्विंटल आहे. सर्वाधिक बाजारभाव ₹7225/क्विंटल आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत असल्याने कापसाच्या किमतींवर नियंत्रण ठेवले जात असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. दुसरीकडे, काही ठिकाणी कापसाला हमी भावापेक्षा कमी भाव मिळत असल्याच्या तक्रारी आहेत. सरकारी कापूस खरेदी केंद्रे तातडीने सुरू करण्याची मागणी त्यामुळे जोर धरत आहे.
अतिरिक्त रकमेचा कॉटलुक ए-इंडेक्सवर
ब्राझील, अर्जेंटिना, टांझानियात चांगले उत्पादन
अमेरिकेतील टेक्सासमध्ये तसेच ऑस्ट्रेलिया आणि ग्रीसमधील उत्पादन कमी झाले असले तरी इतर प्रदेशात चांगले उत्पादन झाले आहे. ब्राझीलमध्ये आधीच्या खालावलेल्या उत्पादनाच्या तुलनेत आता चांगले उत्पादन होत आहे. 2023-24 साठी ब्राझीलमधील कापूस उत्पादन अंदाज आता 1,60,000 गाठींनी वाढवला आहे, सप्टेंबरपासून जागतिक उत्पादनात 2,10,000 गाठींची वाढ झाली आहे, प्रामुख्याने ब्राझील, अर्जेंटिना आणि टांझानियामधील चांगल्या उत्पादनाने चित्र बदलत आहे. वाढीव उत्पादन येत असताना जागतिक वापर आणि व्यापारात अनुक्रमे 89,000 गाठी आणि 35,000 गाठींची किरकोळ घट झाली आहे.
पंजाब-हरियाणात ढेपीला पर्यायी मूरघासाचे उत्पादन
जागतिक पातळीवरील परिस्थितीनुसार कापसाचे दर ठरत असल्याचे विदर्भातील कापूस अभ्यासक स्वप्निल कोकाटे यांनी सांगितले. ते म्हणाले, “सध्या कापसाचे आंतरराष्ट्रीय बाजारातील दर कमी आहेत, त्यातच सुताला पाहिजे तेवढा उठाव नाही. याशिवाय, पंजाब आणि हरियाणात ढेपीला पर्याय म्हणून मूरघासाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. त्यामुळे गेल्या काही काळात ढेपीला पर्यायाने सरकीला मागणी कमी झाली आहे. त्याचाही कापसाच्या किंमतीवर परिणाम होतो.”
भारतात 6% कमी कापूस उत्पादन
या हंगामात भारतीय कापूस उत्पादन 6% कमी होईल, असा अंदाज आहे. मध्य भारत (गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश) तसेच दक्षिण विभागात तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू) यंदा उत्पादन कमी होण्याचा कापूस सल्लागार समितीचा अंदाज आहे. अनेक भागात गुलाबी बोंडअळी आणि अपुऱ्या मान्सूनमुळे कापूस उत्पादनावर परिणाम झाला आहे, असे भारतीय कॉटन असोसिएशनचे अध्यक्ष अतुल गणात्रा यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय किमती घटल्यास भारतीय कापूस महाग
भारतीय कापूस महासंघाचे (ICF) सचिव निशांत आशर यांच्या म्हणण्यानुसार, यावर्षी मुख्य मुद्दा मागणीचा असेल. सध्या बाजारात दररोज 70 हजार ते एक लाख गाठींची आवक होत आहे. मात्र, गेल्या हंगामात कापड गिरण्यांचा एकूण वापर 295 लाख गाठींच्या तुलनेत यंदा 294 लाख गाठी वापर असणे अपेक्षित आहे. या हंगामात 25 लाख गाठींची निर्यात तर 12 लाख गाठींची आयात होण्याची शक्यता आहे. सध्या भारतीय कापसाचे भाव आंतरराष्ट्रीय किमतीच्या बरोबरीने आहेत. आंतरराष्ट्रीय किमतीत घट झाल्यास आयातीला आळा बसून भारतीय कापूस महाग होईल. मागणी आहे, पण पुरवठा नाही, याचा देशांतर्गत वस्त्रोद्योगाला आणखी फटका बसेल.