देशातील हवामान पुन्हा एकदा बदलणार आहे. भारतीय हवामान खात्याने तसा इशारा जारी केला आहे (IMD Alert). मध्य प्रदेश, छत्तीसगडसह देशातील काही राज्यात 5 नोव्हेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रातही काही भागात त्याचा परिणाम जाणवण्याची शक्यता असून राज्यात थंडी, धुकेही वाढणार आहे.
सध्या देशात हवामानाचे वेगवेगळे रंग दिसत आहेत. एकीकडे तापमानात घट झाल्याने थंडीचा प्रभाव दिसून येत आहे, तर दुसरीकडे दक्षिणेकडील राज्यांमध्ये पावसाचा जोर कायम आहे.
मोबाईल स्टार्टरचा वापर करा आणि घर बसल्या विद्युत पंप सुरु करा। Mobile Starter।
आयएमडी पर्जन्यवृष्टी, हवामानाचे अपडेट
भारतीय हवामान खात्याने आता पुन्हा तामिळनाडू, केरळमध्ये पावसाचा इशारा दिला आहे. याशिवाय, जम्मू-काश्मीर, लेह, लडाख, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरपासून उत्तर प्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, छत्तीसगडसह डझनभर राज्यांमध्ये थंडीचा प्रभाव तीव्र होईल.
या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, तामिळनाडूच्या रामनाथपुरम जिल्ह्यात मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मंगळवार ते 5 नोव्हेंबरपर्यंत चेन्नईमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा दिसेल. त्यामुळे तापमानात चढ-उतार होईल. तामिळनाडू आणि केरळच्या अनेक भागात कालही मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. केरळ, तामिळनाडू, माहे, पुडुचेरी आणि कराईकलमध्ये पुढील पाच दिवस हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उर्वरित देशातील हवामानात कोणताही बदल होणार नाही. आंध्र प्रदेश, ओरिसा, आसाम, मेघालय, मणिपूर, नागालँड, मिझोराम, पश्चिम बंगाल, ईशान्य भारत आणि सिक्कीममध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.
या राज्यांमध्ये बर्फवृष्टी
सक्रिय वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे राजस्थानमध्येही हवामान बदलणार आहे. कमकुवत वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे राज्यातील काही भागात रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर, लेह, लडाख आणि हिमाचल प्रदेशमध्ये पुढील 5 दिवसांत हिमवृष्टीची शक्यता आहे, माहे, पुद्दुचेरी, कराईकल आणि लक्षद्वीपमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर कर्नाटकच्या अंतर्गत भागातही हलका पाऊस पडेल. मंगळवार, 31 ऑक्टोबरपासून हिमाचल प्रदेशच्या काही भागात हलका पाऊस आणि हिमवृष्टी अपेक्षित आहे.
मिल्किंग मशीनचा वापर करा व दुग्धव्यवसायात वाढ करा । milking machine।
उत्तर प्रदेश, दिल्लीचे हवामान बदलणार
दिल्लीच्या तापमानातही येत्या काही दिवसात घट होण्याची शक्यता आहे. सध्या सरासरी कमाल तापमान 33 अंश तर किमान तापमान 16 अंश आहे. पुढील काही दिवस धुके कायम राहण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरपासून उत्तर प्रदेशातील हवामानातही बदल होणार आहे. पुढील काही दिवस लखनौमध्ये किमान तापमान 18-19 अंश सेल्सिअस राहील, तर कमाल तापमान 32-33 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून तापमानात झपाट्याने घट होऊन थंडीचा प्रभाव अधिक तीव्र होईल. धुक्यातही वाढ होईल. नोव्हेंबरपासून पंजाबमध्ये धुके आणि थंडीचा प्रभाव अधिक तीव्र होईल. तापमानही कमी होईल. देशाच्या बहुतांश भागात हेच वातावरण राहण्याची शक्यता आहे.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇