खरिपात मूग, उडीद, भुईमूग आणि सोयाबीन ही पिके घेऊन नंतर रब्बी हंगामात ज्वारीची पेरणी केल्यास 20 ते 30 किलो नत्राची बचत होते. तथापि, सोयाबीन-रब्बी ज्वारी हा पीक क्रम विशेषतः बागायतीसाठी अधिक उत्पादनक्षम व आर्थिकदृष्ट्या फायदेशीर दिसून आला आहे.
रब्बी ज्वारी पेरणी व खतमात्रा
ज्वारीचे अपेक्षित उत्पादन मिळविण्यासाठी एकरी 59,200 रोपे ठेवणे जरुरीचे आहे. त्याकरिता ज्वारीची पेरणी 45×15 सें.मी. अंतरावर करावी. बागायत ज्वारीचे अपेक्षित उत्पादन मिळविण्यासाठी ज्वारीची पेरणी 45×12 सें.मी. अंतरावर करावी. पेरणीसाठी दोन चाड्याची पाभर वापरून एकाचवेळी खत आणि बियाणे पेरावे.
जमिनीच्या प्रकारानुसार रासायनिक खतांची मात्रा
हलकी जमीन : जिरायती जमिनीत एकरी 10 किलो नत्र पेरणीचे वेळी द्यावे.
मध्यम जमीन : जिरायती मध्यम जमिनीत एकरी 16 किलो नत्र, 8 किलो स्फुरद आणि बागायती मध्यम जमिनीत 32 किलो नत्र, 16 किलो स्फुरद व 16 किलो पालाश प्रति एकरी द्यावे.
भारी जमीन : जिरायती भारी जमिनीत एकरी 24 किलो नत्र, 12 किलो स्फुरद आणि बागायती भारी जमिनीत 40 किलो नत्र, 20 किलो स्फुरद व 20 किलो पालाश प्रति एकरी द्यावे.
जिरायती जमिनीत संपूर्ण नत्र आणि स्फुरद पेरणीच्या वेळी दोन चाड्याच्या पाभरीने पेरून द्यावे.
बागायती जमिनीत अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद आणि पालाश पेरणीच्या वेळी द्यावे. तर राहिलेले नत्र पेरणीनंतर एक महिन्याने द्यावे.
(कंटेंट सौजन्य : ADT/KVK, बारामती & रेनट्री)
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 👇
- साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनात ऊसाच्या दरावरून यंदाही संघर्ष होण्याची शक्यता
- तयारी रब्बी हंगामाची : हरभरा बियाण्याचे प्रमाण व बीजप्रक्रिया