जळगाव : जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस होवून झालेली अतिवृष्टी व आलेल्या पूरामुळे 4 हजार 335 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यात सर्वाधिक 3 हजार 221 हेक्टर क्षेत्रावरील कापूस पिकाचा समावेश असून धरणगाव तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे.
जळगाव कृषी विभागाकडील प्राथमिक अहवालानूसार, दि. 22 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे चोपडा तालुक्यातील 6 गावातील 176 शेतकर्यांचे 129 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यात भाजीपाला पीक 21 हेक्टर, मका 12 हेक्टर, कापूस 92 हेक्टर तर केळीचे 4 हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले आहे. त्यानंतर पारोळा तालुक्यात 65 गावे बाधीत झाली असून 790 शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. यात ज्वारी आणि बाजरी पिकाचे 3 हेक्टर, भाजीपाला 1 हेक्टर, कापूस पिकाचे 540 हेक्टर अशा एकूण 544 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे.
रायझामिका कोणत्या खतांसोबत देणे जास्त फायदेशीर
धरणगाव तालुक्यात सर्वाधिक नुकसान
दि. 24 रोजी झालेली अतिवृष्टी व पूरामुळे धरणगाव तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. धरणगाव तालुक्यातील 27 गावांमधील 4555 शेतकर्यांचे नुकसान झाले असून यात ज्वारी, बाजरीचे 164 हेक्टर, तूर 55.50, सोयाबीन, 268 भाजीपाला 5.25, मका 466, कापूस 1827 अशा एकूण 2785 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. त्यापाठोपाठ एरंडोल तालुक्यातील 772, पाचोरा तालुक्यात 95 तर भडगाव तालुक्यात 10 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.
कापूस पिकाचे सर्वाधिक नुकसान
जिल्ह्यात एकूण 4 हजार 335 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून यात सर्वाधिक नुकसान हे कापूस पिकाचे झाले आहे. 3 हजार 221 हेक्टर क्षेत्रावरील कापसाचे पीक अतिवृष्टी, पूरामुळे वाया गेले आहे.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- कृषी विस्तार संचालक दिलीप झेंडे यांची ‘ॲग्रोवर्ल्ड’च्या कार्यालयास भेट
- हरितक्रांतीचे जनक एमएस स्वामीनाथन यांचे निधन