पुणे : ताम्हिणी घाट हे महाराष्ट्रातील या पावसाळ्यातील आतापर्यंतचे सर्वात जास्त पावसाचे ठिकाण ठरले आहे. त्यामुळे आंबोली आता दुसऱ्या स्थानावर ढकलले गेले आहे. ताम्हिणी घाटात 21 सप्टेंबर रोजी झालेल्या प्रचंड 220 मिमी पावसाने हा टप्पा गाठला गेला आहे.
पुण्यात मुळशीजवळील ताम्हिणी घाट हा कोकणात जाण्याचा मार्ग आहे. दर पावसाळ्यात येथे अप्रतिम पर्जन्यछाया अनुभवायला मिळते. नैसर्गिक सौंदर्याने नटलेला, पर्जन्य छायेतील हा प्रदेश पावसाळ्यात पुणेकरांचे आवडते पर्यटनस्थळ बनलेले आहे.
पुण्यात 600 मिमी, ताम्हिणीत 6,000 मिमी
पावसाळी हंगामात पुणे शहरात सुमारे 600 मिमी पाऊस पडतो. दुसरीकडे, पुण्यापासून 50 किलोमीटर पश्चिमेला घाटात तब्बल 6,000 मिमी पेक्षा जास्त पाऊस पडतो. कालच्या 220 मिमी पावसाने ताम्हिणी घाटात फक्त सप्टेंबर महिन्यातच 1,000 मिमीचा टप्पा ओलांडला गेला आहे.
पावसाच्या विक्रमाचा सप्टेंबरमधील हा पहिला टप्पा आहे. त्यामुळे या मोसमी पावसाच्या हंगामात ताम्हिणी घाटाने 6,650 मिमीचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे ताम्हिणीने सह्याद्री घाटात अव्वल स्थान पटकावले आहे. आंबोली घाट आता दुसऱ्या स्थानावर घसरला आहे.
पुण्यात येणारा पाऊस अडतो घाटात
ढगांना पुण्यात येण्यापासून रोखण्यात पश्चिम घाटाचा मोठा वाटा आहे. पुण्यात येणार पाऊस ताम्हिणी घाटमाथ्यावरच अडवला जातो. त्यामुळे ताम्हिणी परिसरात पावसाळ्यात सर्वत्र डोंगरदऱ्यातून धबधबे वाहताना दिसतात.
कोकण, राज्याच्या घाट परिसरात आज पावसाची शक्यता
पुढील 2-3 दिवसांत महाराष्ट्राच्या काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने (आयएमडी) व्यक्त केला आहे. कोकण किनारपट्टीचा काही भाग आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात आज-उद्या मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, विदर्भातील 7 जिल्ह्यांसाठी शुक्रवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- लुप्त होणार्या वाणाला अॅड. गणेश हिंगमिरे यांनी दिले जीवदान
- जंबो भाजीपाला पिकविणारा ओमानमधील इंजिनियर शेतकरी