बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने, राज्यात पुढील 4-5 दिवस पावसाची शक्यता आहे. विदर्भ व कोकण किनारपट्टी भागात पावसाचा जोर जास्त राहू शकेल. उत्तर महाराष्ट्रासह राज्याच्या अंतर्गत जिल्ह्यांमध्येही तुरळक ठिकाणी, गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. गोव्यातही काही मुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे.
बंगालच्या उपसागरावर उत्तर ओडिशात कमी दाबाचे क्षेत्र (LPA) तयार झाले आहे. त्यामुळे पश्र्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, ओडिशा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, विदर्भ आणि महाराष्ट्राच्या किनारी भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. किनारी कर्नाटक आणि केरळमध्ये देखील चांगला पाऊस पडेल. पर्यावरणीय अस्थिरतेमुळे तामिळनाडूच्या किनारपट्टीसह अंतर्गत भागात वादळांवर प्रभाव पडेल.
जळगावात आज दुपारी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता
जळगाव परिसरात आज आकाश ढगाळ राहू शकेल. 72% क्लाऊड कव्हर असूनही वातावरणात कामालीचा उकाडा जाणवत आहे. वातावरणात आद्रता (ह्युमिडिटी) तब्बल 79% इतकी आहे. त्यामुळे तापमान 35 अंशांपर्यंत जाणवत आहे. दुपारी साडेतीन वाजेनंतर पावसाची शक्यता आहे. आज दिवसभरात हलक्या स्वरूपाचा पाऊस राहू शकेल. जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. शुक्रवारपासून रविवारपर्यंत पावसाची शक्यता 40%हून अधिक आहे. खान्देशसह उत्तर महाराष्ट्रात साधारणतः अशीच स्थिती सर्वत्र राहू शकते. धुळे व नंदुरबार जिल्ह्यात मात्र तुलनेने पाऊस कमी राहू शकेल.
आजचा पावसाचा अंदाज – ज्योती सोनार, शास्त्रज्ञ, पुणे वेधशाळा
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- उत्तर कर्नाटकात 2,000 वर्षे पुरातन पॉट इरिगेशन सिंचन प्रणाली पुनरुज्जीवित!
- सिंचनाच्या “या” पद्धतीमुळे दुष्काळापासून वाचली आंध्र प्रदेशातील पिके!