मुंबई : गेल्या आठवडाभरात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस बरसत आहे. मात्र, राज्यातील 23 जिल्ह्यात अजूनही पावसाची तूट आहे. 20 जुलै अखेरपर्यंत सांगली जिल्ह्यात पावसाची सर्वाधिक तूट आहे. त्याखालोखाल, हिंगोली आणि सातारा जिल्ह्यात पावसाची कमतरता दिसत आहे. राज्यातील फक्त 13 जिल्ह्यात आजवर सरासरीइतका किंवा त्याहून अधिक पाऊस झालेला आहे.
भारतीय हवामान विज्ञान विभागाच्या (IMD) जल हवामान विज्ञान शाखा म्हणजेच हायड्रोमेट शाखेच्या (CRIS) आकडेवारीतून राज्यात अजूनही पावसाची तूट असल्याचे दिसत आहे. यंदाच्या पावसाळी हंगामात म्हणजे 1 जूनपासून ते 20 जुलै अखेरपर्यंत सांगली जिल्ह्यात 61 टक्के, तर हिंगोली जिल्ह्यात 55% आणि सातारा जिल्ह्यात 39% इतकी पावसाची तूट आहे.
1 जून ते 20 जुलैअखेर पावसाची जिल्हानिहाय तूट
सांगली – 61%, हिंगोली – 55, सातारा – 39, जालना – 39, सोलापूर – 33, अकोला – 28, वर्धा – 28, अमरावती – 24, अहमदनगर – 24, कोल्हापूर – 23, बीड – 21, धाराशिव – 16, पुणे – 15, नाशिक – 12, धुळे – 9, छत्रपती संभाजीनगर – 9, नागपूर – 9, वाशीम – 8, यवतमाळ – 8, रत्नागिरी – 7, परभणी – 7, चंद्रपूर – 3, बुलढाणा – 3%.
निर्मल रायझामिका 👇
यंदाच्या पावसाळी हंगामात आजवर पावसाची सरासरी गाठलेले जिल्हे
पालघर : +36%, ठाणे : +31%, भंडारा : +29%, लातूर : +21%, रत्नागिरी : +20%, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर : +15%, जळगाव : +9%, गोंदिया : +8%, नंदुरबार : +7%, गडचिरोली : +7%, नांदेड : +6%, सिंधुदुर्ग : +2%,