मुंबई : भारतीय हवामान खात्याने (IMD) आज कोकणसाठी अतिवृष्टीचा रेड अलर्ट जाहीर केला आहे. तर विभागनिहाय इशाऱ्यात, उत्तर- मध्य महाराष्ट्र, विदर्भात ऑरेंज तर मराठवाड्यात यलो अलर्ट जारी केला आहे. “आयएमडी”चे आज सकाळी अपडेट केलेले जिल्हानिहाय अलर्ट, कोणत्या जिल्ह्यासाठी काय आहेत, तेही आम्ही आपणास सांगणार आहोत.
हवामान खात्याने महाराष्ट्रासाठी आजपासून पुढील 4-5 दिवसांसाठी तीव्र हवामानाचा इशारा जारी केला आहे. पुढील 3-4 दिवस कोकण आणि उत्तर- मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. याशिवाय, काही भागात खूप दिवसांनी रेड अलर्ट दिसतोय.
कोकण ते केरळपर्यंत पाऊसफुल्ल
आज, 6 जुलैच्या ताज्या सॅटेलाइट निरीक्षणानुसार, पुढील काही तासांनी दक्षिण कोकण ते केरळ किनारपट्टीपर्यंत काही ठिकाणी अती तीव्र पावसाची शक्यता आहे. उत्तर पालघर, लगतचा गुजरात प्रदेशात देखील मुसळधार पाऊस राहील. मुंबईत अंशतः ढगाळ वातावरण आणि दुपारी पावसाची शक्यता असल्याचे “आयएमडी”ने म्हटले आहे.
IMD चे राज्यातील आजचे जिल्हानिहाय अलर्ट
भारतीय हवामान खात्याने आज सकाळी 11 वाजता अपडेट केलेले जिल्हानिहाय ताजे अलर्ट्स पुढीलप्रमाणे –
रेड अलर्ट : सिंधुदुर्ग
ऑरेंज अलर्ट : कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, रायगड, मुंबई, पुणे, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा.
* यलो अलर्ट :* धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, ठाणे, पालघर, उर्वरित विदर्भ (ऑरेंज अलर्ट भाग वगळून).
*ग्रीन अलर्ट (कोणताही पावसाचा इशारा नाही) : सांगली, सोलापूर, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, बीड, परभणी, हिंगोली.
गेल्या 24 तासात 50 मिलिमीटरहून अधिक पाऊस झालेले तालुके/ठिकाण
सिंधुदुर्ग : वैभववाडी – 180, रामेश्वर ॲग्री – 143.3, कुडाळ – 130, कणकवली – 126, देवगड – 120, मुलदे ॲग्री – 115, सावंतवाडी – 110, मालवण – 94, दोडामार्ग – 78, रत्नागिरी : राजापूर – 143, श्रीवर्धन, रायगड – 61, पालघर : पालघर – 146, वसई – 66, गगनबावडा, कोल्हापूर – 116.
उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भागात गेल्या 24 तासात झालेला पाऊस – AgroWorld Jalgaon Team
जळगाव : 49.4 मिमी, नंदुरबार : नंदुरबार – 12, शहादा – 22, धडगाव अक्राणी – 36, सोलापूर – 36.9, नांदेड – 15, बीड 77.4, जालना – 8, छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) : सोयगाव – 53, वैजापूर – 48, खुलताबाद – 12, फुलंब्री – 5, लातूर : उदगीर – 98, जळकोट – 85, चाकूर – 82, रेणापूर – 75, औसा 63, शिरूर अनंतपाल – 54, देवणी – 48, लातूर – 30, धाराशिव : उस्मानाबाद – 25 2, कळंब – 100, भूम – 77, वाशी – 63, परांडा – 40, तुळापूर – 36.2, लोहारा – 20