मुंबई : बंगालच्या उपसागरात नवी मान्सून प्रणाली विकसित होत आहे. त्यामुळे या आठवडाअखेर मुंबई, कोकणात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता “स्कायमेट” (Skymate Wether) या खासगी हवामान संस्थेने वर्तविली आहे.
बंगालच्या उपसागरात आणखी एक नवी प्रणाली विकसित होत आहे. याक्षणी दक्षिण आणि नैऋत्य आणि लगतच्या पश्चिम मध्य उपसागरावर चक्रीवादळसदृश्य परिवलन दिसत आहे. पुढील 18 ते 30 तासात ते उत्तर-पश्चिम उपसागराच्या किनाऱ्याकडे व नंतर हळूहळू उत्तरेकडे सरकेल. त्याचवेळी ते भारताच्या मध्य, अंतर्गत भागताही शिरेल. त्यामुळे मुंबई, कोकणात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढू शकेल.
6, 7 जुलै रोजी मुंबईत अतिवृष्टीची शक्यता (Bay of Bangal Off Shore Turf)
नव्याने होणार असलेल्या पावसाचे श्रेय दोन बाबींना द्यावे लागेल. त्यापैकी एक आहे ऑफ शोर ट्रफ म्हणजे पावसाला कारणीभूत असलेला अनुकूल पट्टा, जो महाराष्ट्रापासून केरळपर्यंत आहे. त्यामुळेच कोकणात जोरदार पाऊस पडेल.
पुढील दोन दिवस मुंबईत पुरेशा विश्रांतीसह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यातही संध्याकाळी किंवा रात्री तसेच पहाटेपासून सकाळी पावसाची विश्रांती राहू शकेल. त्यानंतर दिवसभरात मात्र पावसाचा जोर धरला वाढेल व जोरदार सरी कोसळतील.
9 जुलैपासून कमी होणार पाऊस : Bay of Bangal मधील प्रणालीचा परिणाम – Skymate Weather
6 आणि 7 जुलै रोजी मुंबईत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. 8 जुलैला मात्र त्याचा जोर थोडासा कमी राहील, मुसळधार सुरूच राहील. 9 जुलैपासून, पाऊस कमी होऊन हलक्या ते मध्यम पावसाने मुंबईकरांना थोडासा दिलासा मिळू शकतो.
कापसाच्या गॅप फिलिंगसाठी तरुणाचा भन्नाट प्रयोग
https://youtu.be/vJ7zM35MvpM
Mumbai Monsoon : मुंबईत पावसाची सरासरी ओलांडली
यंदा मुंबई शहरात मान्सूनच्या पावसाला उशीरा सुरुवात झाली आहे. तरीही जून महिन्यात पावसाची कामगिरी चांगली राहिली. गेल्या आठवड्यातील जोरदार पावसाच्या हजेरीने मुंबईत मासिक सरासरी ओलांडली गेली आहे.
पावसाळ्यात जुलै महिना हा वर्षातील सर्वात जास्त पावसाळी महिना मानला जातो. या महिन्यात सरासरी 919.9 मिमी पाऊस पडतो. जुलैमध्ये, मुंबईत दररोज वेगवेगळ्या तीव्रतेने पाऊस पडतो. या महिन्यात मुंबईत पाऊस पडत नसेल, असा क्वचितच एखादा दिवस असतो.