मुंबई : कापसाला गेल्या वर्षी १२ हजार रुपये भाव मिळाला होता. या वर्षी देखील चांगला भाव मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली. आज न उद्या कापसाचे भाव वाढतील, या प्रतीक्षेत अनेक शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवला आहे. कापसाच्या भावात वाढ होईल या प्रतीक्षेत शेतकरी असताना भावात घसरण झाल्याचे दिसून येते आहे.
कापसाच्या गॅप फिलिंगसाठी तरुणाचा भन्नाट प्रयोग
https://youtu.be/vJ7zM35MvpM
सोमवारी (दि.26) कापसाला प्रती क्विंटल 7 हजार 100 रुपये इतका दर मिळाला होता. मंगळवारी (दि. २७) यात 250 रुपयांनी घसरण होवून भाव 6 हजार 850 रुपयांवर पोहोचले आहेत. मनवत कृषी उत्पन्न बाजार समितीत या दराने कापसाची खरेदी केली जात आहे.
सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)
बाजार समिती |
परिणाम |
आवक |
सर्वसाधारण दर |
कापूस (27/6/2023) |
|||
सावनेर | क्विंटल | 1600 | 6825 |
कळमेश्वर | क्विंटल | 265 | 6500 |
मनवत | क्विंटल | 3200 | 6850 |
वरोरा | क्विंटल | 50 | 6800 |
वरोरा-माढेली | क्विंटल | 27 | 6800 |
काटोल | क्विंटल | 98 | 6700 |
हिंगणघाट | क्विंटल | 900 | 6800 |