उत्तर महाराष्ट्रासह संभाजीनगर जिल्ह्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा
जळगाव जिल्ह्याचा काही भाग, जळगावला लागून नाशिक जिल्ह्याचा भाग, संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड, सोयगाव, सिल्लोड आणि विदर्भात अकोला, चंद्रपूर व यवतमाळ वगळता याक्षणी उर्वरित महाराष्ट्राच्या आभाळात ढग दिसत नाहीत.
जळगावसह उत्तर महाराष्ट्र दुपारी एक वाजेची स्थिती 👇
याक्षणीची पाऊस स्थिती👇
• आज दुपारी 1 वाजता वेदर रडार स्थितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील रावेर, पाल, खिरोदा, फैजपूर, न्हावी, भुसावळ शहर, नशिराबाद, भादली, जळगाव शहर, पहूर, पाचोरा, भडगाव आणि चाळीसगाव परिसरात पावसाचे ढग दिसत आहेत.
रडार इमेजनुसार, दुपारी दीड वाजता, धुळे जिल्ह्यात नामपूरलगत देऊर-म्हसदी, भाडणे, चौगाव, हिंगणे, पिंपरखेड, नागझिरी, नांद्रे, लोणखेडी, डोंगराळे, नेर, कुसुंबा, सुतारपाडा, मेहेरगाव, कावठी, सुकवद, निमडाळे तसेच जळगाव जिल्ह्यालगत बोरकुंड, शिरुड, सांजोरी, उडाणे, दह्याने, तिखी, मोरवड तांडा आदी परिसरात ढगांची गर्दी दिसत आहे. उर्वरित धुळे जिल्ह्यात तूर्तास आकाश निरभ्र दिसत आहे. काही ठिकाणी अगदी तुरळक ढग दिसतात.
रडार इमेजनुसार, दुपारी दीड वाजता, नाशिक जिल्ह्यात आर्वीपासून मालेगाव-नामपूर, चाळीसगावलगत नांदगावपर्यंत, देवळा परिसरात आणि इगतपुरी-घोटीत ढगांची गर्दी दिसत आहे. उर्वरित नाशिक जिल्ह्यात आकाश मोकळे आहे.
सध्या महाराष्ट्रात वाहत असलेल्या वाऱ्यांची दिशा. या नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या वाहण्याच्या दिशेनुसार, पावसाचे ढग हे मुंबईकडून नाशिक व पुढे खान्देशात जातील. तसेच कोकण – पश्चिम महाराष्ट्रातून नगर, सोलापूर, मराठवाड्यातून विदर्भ आणि तेलांगाणाकडे ढगांचा प्रवास होईल.