मुंबई : मळणी यंत्र हे कृषी यांत्रिकीकरणाठी एक प्रमुख यंत्र आहे. ज्वारी, बाजरी, मका, मूग, उडीद, तूर, सोयाबीन, हरभरा इत्यादी पिकांची मळणी या यंत्राद्वारे करता येते. तुम्हाला जर मळणी यंत्र खरेदी करायचं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाने कृषी यांत्रिकीकरण ही योजना सुरु केली आहे. चला तर मग जाणून घेवूया काय आहे ही योजना ?, किती मिळणार अनुदान ?, कागदपत्रे कोणती लागणार ?, अर्ज कुठे करायचा ?…
केंद्र सरकारने अनेक पावलं उचलली त्यात पारंपरिक शेतीतून शेतीच्या यांत्रिकीकरणाकडे जाणे. तसेच शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणे हे केंद्र शासनाचं मुख्य उद्दिष्ट आहे. यासाठीच ही योजना १८ मे २०१८ रोजी सुरु करण्यात आली होती.
अस्सल देवगड हापूस आंबा खावासा वाटतोय पण…
https://youtu.be/xMZLeqr2Es8
काय आहे ही योजना ?
शेतातील कामे करण्यासाठी अनेक वेळा मजूर मिळत नाही अशावेळी कृषी यांत्रिकीकरण करणे योग्य ठरते. तसेच शेतकऱ्यांचा त्रास कमी व्हावा यासाठी ही योजना सरकारने सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून मळणी यंत्रासाठी शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला शेतकरी आणि अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना या योजनेत 50 टक्के अनुदान मिळणार आहे. ४० टक्के अनुदान हे उर्वरित शेतकऱ्यांना मिळणार आहे. या अनुदानात त्या त्या यंत्राच्या ताकदीनुसार बदल होतो.
किती मिळणार अनुदान ?
अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी, महिला शेतकरी, अनुसूचित जाती व जमाती शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना चार टन प्रति टना पेक्षा जास्त क्षमता असलेल्या व 35 बीएचपी (BHP) पेक्षा जास्त असलेल्या मळणी यंत्रासाठी २ लाख ५० हजार रुपये इतकं अनुदान दिलं जातं. तसेच चार टन प्रती तासापेक्षा कमी क्षमतेच्या मळणी यंत्राला 80 हजार रुपये इतका अनुदान दिले जाते.
ही आहेत आवश्यक कागदपत्रे
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड, सातबारा व 8 अ उतारा, जातीचा दाखला, बँक पासबुक, यंत्राचे कोटेशन, यंत्राचा परीक्षण अहवाल ही कागदपत्रे लागणार आहे.
येथे करा अर्ज
या योजनेसाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी फार्मर स्कीम Mahadbt farmers scheme या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. या संकेतस्थळावर तुम्हाला सुरुवातीला शेतकरी योजना हा पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर ‘वैयक्तिक लाभार्थी’ या पर्यायावर जाऊन अर्ज करता येणार आहे.