मुंबई : कापूस हे सर्वात महत्त्वाचे पीक आहे. कापूस हे पीक शेतकऱ्यांसाठीच नव्हे तर उद्योगधंद्यांसाठी देखील सर्वात महत्त्वाचे आहे. वैद्यकीय क्षेत्रापासून तर गारमेंट उद्योगपर्यंतचे उद्योग कापसावर अवलंबून आहेत. त्यामुळे कापूस या पिकाला मोठी मागणी असते. त्यामुळे कापसाचा दर हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे.
हिवाळ्यात लागवड केलेला कापूस काढण्यास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांकडून त्या त्या स्थानिक बाजार समिती, जिनिंग प्रेस, व्यापाऱ्यांकडे कापसाची विक्री केली जात आहे. सध्या सर्वाधिक दर हा मनवत कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळत आहे. याठिकाणी ८१२५ रुपये दर मिळाला तर ३७०० क्विंटल आवक झाली आहे.
बाजार समिती |
आवक |
सर्वसाधारण दर |
कापूस |
||
मनवत | 3700 | 8125 |
वडवणी | 18 | 7650 |
पारशिवनी | 1150 | 7800 |
वरोरा | 1002 | 7500 |
वरोरा-माढेली | 650 | 7550 |
वरोरा-खांबाडा | 376 | 7800 |
काटोल | 60 | 7750 |
नरखेड | 180 | 7500 |
जळगाव | – | 7950 |
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- फावल्या वेळेचा सदुपयोग करत सुरू केला प्रक्रिया उद्योग
- Success Story : ‘कल्पने’च्या पलीकडील ‘सुपर वुमन’