• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

Cultivation of wheat : गव्हाच्या पिकाचे असे करा व्यवस्थापन, उत्पादनात होईल वाढ

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 23, 2022
in तंत्रज्ञान / हायटेक
0
Cultivation of wheat
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई : Cultivation of wheat… रब्बीच्या हंगामाला सुरुवात झाली असून शेतकर्‍यांकडून या हंगामातील गहू, हरभरा, मका, भुईमूगाच्या पेरणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, हे काम करीत असतांना त्याचे तसेच पेरणी नंतर तांबेरा, काजळी यांसारखे रोग पडू नये यासाठी काय काळजी घ्यावी, व्यवस्थापन कसे करावे, याबाबतची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला ही बातमी सविस्तरपणे वाचणे गरजेचे आहे.

गहू हे समशीतोष्ण प्रदेशात पिकणारे पिक असून जगभरातील निम्म्या लोकांच्या आहारात गव्हाला मुख्य स्थान आहे. त्यामुळे जगभरात गव्हाचे उत्पादन मोठया प्रमाणावर घेतले जाते. भारतात पंजाब आणि मध्यप्रदेश या राज्यात गव्हाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. उन्हाळ्याच्या शेवटी कापणीसाठी वसंत गव्हाची लागवड केली जाते, तर हिवाळ्याच्या गहूची लागवड हिवाळ्याच्या सुरूवातीला तर उन्हाळ्यातील गव्हाची लागवड उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या काळात केली जाते.

Planto

गहूच्या लागवडीसाठी (Cultivation of wheat) पाण्याचा चांगला निचरा होणारी, भारी जमिन योग्य असते. परंतु हलक्या आणि मध्यम जमिनीत भरपूर भरखते व संतुलित रासायनिक खतांचा वापर केल्यास चांगले उत्पादन घेता येते. गव्हाच्या योग्य उत्पादनासाठी जमिन भुसभुशीत असणे जरुरीचे असते. कारण अशा जमिनीमध्ये गव्हाच्या मुळांची वाढ, विस्तार व कार्यक्षमता वाढून जमिनीतील अन्नद्रव्यांचे, पाण्याचे व्यवस्थित शोषण होते.

असे करा व्यवस्थापन

रब्बीच्या हंगामात गव्हाची लागवड करण्यापूर्वी व खरीपाचे पिक निघाल्यावर लोखंडी नांगराने खोलवर (20-25 से.मी.) नांगरट करावी. नांगरट झाल्यावर हेक्टरी 25 ते 30 बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट खत टाकावे. जमिनीची दोन वेळा कुळवणी करावी. बागायती गव्हाची पेरणी शक्यतो नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात करावी. पेरणी 15 नोव्हेंबरनंतर उशिरा केल्यास प्रत्येक पंधरवड्यात हेक्टरी 2.5 क्विंटल उत्पादन कमी येते. त्यामुळे 15 डिसेंबरनंतर केलेल्या गव्हाची लागवड फायदेशीर ठरत नाही.

बागायती गहू वेळेवर पेरणीसाठी जमिनीत ओलावा नसल्यास, जमीन ओलवून घ्यावी. वापसा आल्यानंतर जमिन कुळवावी. पेरणीसाठी प्रति हेक्टरी 100 ते 125 किलो बियाणे वापरावे. रासायनिक खतांचा पहिला हप्ता आणि बियाणे दोन चाद्याच्या पाभरीने 22.5 तरावर पेरावे. पाभरीने पेरणी एकेरी करावी त्यामुळे आंतरमशागत करणे सुलभ जाते. पेरणी करताना प्रति हेक्टरी 60 किलो नत्र, म्हणजेच 130 किलो युरिया, 60 किलो स्फुरद म्हणजेच 375 किलो सिंगल सुपर फॉस्पेट व 40 किलो पालाश म्हणजेच 67 किलो म्युरेट ऑफ पोटॅश दयावे. उर्वरित नत्राचा हप्ता खुरपणी झाल्यानंतर तीन आठवड्यांनी 130 किलो युरिया प्रति हेक्टरी पहिल्या पाण्याच्या वेळी दयावे.

NIrmal Seeds

असे करा तण व्यवस्थापन

लागवडीनंतर शेतकर्‍यांना भेडसावणारा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे तण व पिकावर पडणारा रोग आहे. मात्र, त्याचेही योग्य व्यवस्थापन केल्यास त्यापासूनही आपण पिकांचा काही प्रमाणात बचाव करू शकतो. गव्हामधील तण नियंत्रणासाठी, उगवणीपूर्वी ऑक्सिफ्लोफेन हे तणनाशक 425 मिली. प्रति हेक्टरी किंवा पेडिमिथॅलीन हे तणनाशक 2.5 किलोग्रॅम प्रति हेक्टरी 750 लिटर पाण्यात मिसळून पेरणी केलेल्या क्षेत्रावर एकसमानपणे फवारावे.

तसेच या तणनाशकाची फवारणी करणे शक्य न झाल्यास विशेषतः द्विदल वर्गीय तणांच्या नियंत्रणासाठी पेरणीनंतर 27 ते 35 दिवसा दरम्यान 2-4 डी (सोडीयम क्षार) हे तणनाशक 1.0 ते 1.5 किलो प्रति हेक्टरी याप्रमाणे 500 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. फवारणीच्या वेळी तणे 2-4 पानांच्या अवस्थेत असावीत याची काळजी घ्यावी. तसेच 2-4 डी फवारणी करताना हे तणनाशक आजूबाजूच्या इतर विशेषतः द्विदल वर्गीय पिकांवर उडणार नाही याची काळजी घ्यावी. तणनाशकाच्या फवारणीसाठी फ्लॅटफॅन किंवा फ्लडजेट नोझल वापरावे.

रोग पडू नये यासाठी ही घ्या काळजी

गव्हाच्या लागवडीनंतर त्यावर तांबेरा, काळजी यासारखे रोग पडण्याची शक्यता असते. तांबेरा हा रोग हा हवेव्दारे पसरणारा बुरशीजन्य रोग आहे. या रोगामुळे पानांवर विखुरलेले नारिंगी रंगाचे फोडे येतात, जे पुढे काळे पडतात. या फोडांमध्ये बुरशीची बीजे असतात. तांबेर्‍यापासून नुकसान टाळण्यासाठी प्रतिबंधक वानांचा वापर करावा. तांबेर्‍याची लागण दिसताच बुरशीनाशक औषधांची फवारणी करावी. रोगाची तीव्रता लक्षात घेउन 10 ते 15 दिवसांचे अंतराने फवारण्या कराव्यात.

काजळी या रोगाचा प्रसार बियाण्याव्दारे होते. रोगाट ओंब्यामध्ये दाण्याऐवजी काळी भुकटी तयार होते. या रोगाच्या नियंत्रणासाठी पेरणीपूर्वी बियाण्यास बुरशीनाशकाची बिज प्रक्रिया करावी, तसेच शेतातील रोगट झाडे मुळासकट उपटून नष्ट करावीत, असे केल्यास काजळी या रोगापासून आपण गहू या पिकाचे संरक्षण करू शकतो. तसेच गव्हावरील करपा रोगाच्या नियंत्रणासाठी रोगाचे प्रादुर्भाव दिसताच बुरशीनाशक औषधांची फवारणी करावी.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • Rabi Crop : वाढत्या थंडीचा रब्बीतील या पिकांना फायदा
  • Good news for farmers : 50 हजारांच्या अनुदानाच्या दुसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी सुरू

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: गहू लागवडरब्बी हंगामव्यवस्थापन
Previous Post

Rabi Crop : वाढत्या थंडीचा रब्बीतील या पिकांना फायदा

Next Post

धान व भरडधान्य खरेदीकरिता ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणीसाठी मुदतवाढ

Next Post
भरडधान्य खरेदी

धान व भरडधान्य खरेदीकरिता ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणीसाठी मुदतवाढ

ताज्या बातम्या

शाळकरी बहिणींचा शेळीच्या दुधापासून कोटीचं स्टार्टअप

शाळकरी बहिणींचा शेळीच्या दुधापासून कोटीचं स्टार्टअप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 21, 2026
0

स्कॉटलंड

दुधाला भाव नाही, घामाचे दाम नाही: स्कॉटलंडमध्ये 20 वर्षांतील सर्वात तीव्र डेअरी संकट!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 20, 2026
0

GI टॅग ते जागतिक बाजारपेठ; ‘जळगाव केळी’ची आंतरराष्ट्रीय झेप

GI टॅग ते जागतिक बाजारपेठ; ‘जळगाव केळी’ची आंतरराष्ट्रीय झेप

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 21, 2026
0

उत्तर भारतात पुन्हा कडाक्याची थंडी

उत्तर भारतात पुन्हा कडाक्याची थंडी; महाराष्ट्रात हळूहळू तापमान वाढणार – IMD

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 19, 2026
0

महाराष्ट्रात थंडीचे पुनरागम

महाराष्ट्रात थंडीचे पुनरागम: जाणून घ्या सद्यस्थिती, कारणे आणि पुढील 72 तासांचा हवामान अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 16, 2026
0

भाजीपाल्याची लागवड

जानेवारी-फेब्रुवारीत करा “या” पिकांची, फळ-भाजीपाल्याची लागवड अन् मिळवा रग्गड उत्पन्न!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 14, 2026
0

मोबाईलच सांगणार तुमच्या नुकसानीचा आकडा

पशुपालकांनो, आता मोबाईलच सांगणार तुमच्या नुकसानीचा आकडा! लुवास विद्यापीठाचा ‘हा’ ॲप ठरणार गेम चेंजर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 13, 2026
0

जैन हिल्स कृषी महोत्सव

जैन हिल्स कृषी महोत्सव 2025-26: जिथे तंत्रज्ञान आणि परंपरा एकत्र येऊन शेतकऱ्यांचे भविष्य घडवतात

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 11, 2026
0

महाराष्ट्र थंडीने गारठला: पाच वर्षांतील सर्वात तीव्र हिवाळा; हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

महाराष्ट्र थंडीने गारठला: पाच वर्षांतील सर्वात तीव्र हिवाळा; हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 10, 2026
0

जानेवारी महिन्यात करावयाची महत्त्वाची शेती कामे

जानेवारी महिन्यात करावयाची महत्त्वाची शेती कामे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 10, 2026
0

तांत्रिक

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

जगाच्या पाठीवर

शाळकरी बहिणींचा शेळीच्या दुधापासून कोटीचं स्टार्टअप

शाळकरी बहिणींचा शेळीच्या दुधापासून कोटीचं स्टार्टअप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 21, 2026
0

स्कॉटलंड

दुधाला भाव नाही, घामाचे दाम नाही: स्कॉटलंडमध्ये 20 वर्षांतील सर्वात तीव्र डेअरी संकट!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 20, 2026
0

GI टॅग ते जागतिक बाजारपेठ; ‘जळगाव केळी’ची आंतरराष्ट्रीय झेप

GI टॅग ते जागतिक बाजारपेठ; ‘जळगाव केळी’ची आंतरराष्ट्रीय झेप

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 21, 2026
0

उत्तर भारतात पुन्हा कडाक्याची थंडी

उत्तर भारतात पुन्हा कडाक्याची थंडी; महाराष्ट्रात हळूहळू तापमान वाढणार – IMD

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 19, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish