Crop Loan… महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अल्पमुदत पीककर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रत्येकी ५० हजारांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे. मात्र, अद्याप देखील पात्रता याद्या प्रकाशित करण्यात आल्या नसून याच याद्यांच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. दरम्यान, या अनुदानासाठी तुम्ही पात्र आहात का ? तुमची संपूर्ण कागदपत्रे बरोबर आहेत का ? हीच ऑनलाईन पद्धतीने माहिती कशी पहायची, हे जाणून घेऊया…
कडबा कुट्टी मशीनसाठी 75 टक्के अनुदान
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/5hVluXXF3J0
प्रोत्साहन अनुदान
2019-20-21 या तीन वर्षांत किमान 2 वर्षे पीक कर्जाची (Crop Loan) परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हे प्रोत्साहन अनुदान 15 ऑक्टोबरपासून जमा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. ज्यासाठी याद्या मागवण्यात आल्या होत्या. परंतु या याद्यांमधील जवळपास 7 लाखांहून अधिक शेतकऱ्यांची माहिती चुकीची असल्यामुळे शेतकऱ्यांना अपात्र करण्यात आले. याचमुळे या याद्या पुढे अनुदानासाठी जाऊ शकल्या नाहीत. परंतु या याद्या पुन्हा 12 ऑक्टोबर रोजी प्रकाशित केल्या जातील असे सांगण्यात आले होते. मात्र अद्याप देखील या याद्या प्रकाशित करण्यात आल्या नसून याच याद्यांच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत.
कशी पाहाल तुमची पात्रता?
50 हजारांच्या प्रोत्साहन अनुदानासाठी तुम्ही पात्र आहात की नाही? हे पाहणं महत्त्वाचं आहे. ज्यासाठी तुम्ही ऑनलाईन प्रक्रिया करून देखील तुमची कागदपत्रे आणि पात्रता पडताळू शकता. ज्यासाठी तुम्ही सीएससीच्या (CSC) पोर्टलवर जाऊन तुमची पात्रता तसेच बँक खाते याबाबत माहिती मिळेल. यानंतर तुम्हाला महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेच्या पोर्टलवर जावे लागेल. यावर तुम्ही विचारलेली माहिती भरून तुमची पात्रता कागदपत्रे तपासू शकता. शेतकरी पूर्णपणे पात्र झाल्यानंतर याद्या प्रकाशित होतील. त्यानंतर लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरही अनुदानाची रक्कम जमा होईल. लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होईल.
‘या’ शेतकऱ्यांना मिळणारा लाभ
2019-20-21 या तीन वर्षांतील किमान 2 वर्षे पीक कर्ज आणि पुर्नगठीत पीक कर्ज होणार माफ.
कर्जमुक्तीची रक्कम राज्यशासन शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात थेट भरणार.
राष्ट्रीयकृत, व्यापारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, ग्रामीण बँका, विविध कार्यकारी सहकारी संस्था यांच्याकडून शेतकऱ्यांनी घेतलेले पीक कर्ज आणि पुनर्गठीत पीक कर्ज माफ होणार.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- PM Kisan Yojna : PM किसान योजनेचा ’12’ वा हफ्ता या दिवशी होणार खात्यात जमा ; जाणून घ्या… संपूर्ण माहिती एका क्लिकवर !
- Good News : ड्रॅगन फ्रुट शेतीसाठी मिळणार 40 टक्के अनुदान ; राज्य सरकारचा मोठा निर्णय