लंडन : ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे अनेक अद्भुत किस्से आहेत मात्र, त्या राष्ट्रप्रमुख म्हणून सर्वप्रथम ईमेलचा वापर करणारी टेकसॅव्ही राणी होत्या, हे अनेकांना माहिती नसेल. अशाच काही आणखी राणीबाबत फारशा न ऐकलेल्या गोष्टी आणि त्यांना ब्रिटनसह जगभरातील वृत्तपत्रांनी वाहिलेली श्रद्धांजली, यावरही एक नजर टाकूया …
राणी एलिझाबेथ यांच्या पश्चात चार मुलगे, आठ नातू आणि 12 पणतू असा परिवार आहे.
वंडरवर्ल्ड : महाराणी एलिझाबेथकडून सर्वप्रथम ईमेलचा वापर
राष्ट्रप्रमुख म्हणून सर्वप्रथम राणी एलिझाबेथ यांनी ई-मेलचा वापर केला होता. 26 मार्च 1976 रोजी एलिझाबेथ यांनी त्यांचा पहिला ई-मेल पाठवला होता. आश्चर्य म्हणजे बहुतांश जग तेव्हा ई-मेलबाबत काही जाणतही नव्हते. राणीच्या वापरानंतर ई-मेलचा सार्वजनिक ट्रेंड सुरू झाला. इंग्लंडमधील माल्व्हर्न रॉयल सिग्नल आणि रडार एस्टॅब्लिशमेंट सेंटरमध्ये नेटवर्क टेक्नॉलॉजी प्रात्यक्षिक दरम्यान राणीने हा ई-मेल पाठवला होता.
इंदिरा गांधींप्रमाणे राणीच्या हत्येचा प्रयत्न
13 जून 1981 रोजी, बकिंगहॅम पॅलेस येथे राणी एलिझाबेथ यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सन्मान परेड आयोजित करण्यात आली होती. राणी स्वतः परेडला उपस्थित होत्या. त्यावेळी एका 17 वर्षांच्या मुलाने त्यांना गोळ्या घालण्याचा प्रयत्न केला होता. परेड दरम्यान राणी घोड्यावर स्वार होती. या तरुणाने राणीवर सहा फायर केले. पोलिसांनी त्याला जागीच पकडले. त्यानंतर, हल्लेखोराला तीन वर्षे मानसोपचार तज्ज्ञांच्या संरक्षणाखाली तुरुंगात ठेवण्यात आले.
महाराणी स्वतः चालवायच्या सैन्यासाठी ट्रक
दुसऱ्या महायुद्धादरम्यान राणी एलिझाबेथ या फक्त 18 वर्षांच्या राजकुमारी होत्या. त्या ब्रिटिश सेनेच्या महिला सहाय्यक प्रादेशिक सेवेत सामील झाल्या. त्यांना लंडनमध्ये मिलिटरी ट्रक ड्रायव्हर आणि मेकॅनिक बनण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. जगभरातील संपूर्ण राजघराण्यातील त्या एकमेव अशा महिला सदस्य आहेत, ज्या सशस्त्र दलात प्रत्यक्ष सामील झाल्या होत्या. हा काळ दुसऱ्या महायुद्धाचा होता. यावेळी त्यांनी स्वतः सैन्याचा ट्रक चालवला.
पासपोर्ट, व्हिसाशिवाय 116 देशांचा प्रवास
राणी एलिझाबेथ यांनी आयुष्यात सुमारे 116 देशांचा प्रवास केला. त्यापैकी 96 भेटी अधिकृत सरकारी दौऱ्यात होत्या. त्यांच्या दौऱ्यांवर सोबत 261 अधिकाऱ्यांचा ताफा असायचा. महाराणी एलिझाबेथ यांनी 116 देशांचा दौरा केला, परंतु त्यांच्याकडे स्वत: चा पासपोर्ट नव्हता. पासपोर्ट नाही, व्हिसा नाही तरीही जगातील कुठल्याही देशात प्रवेशाची मुभा असलेल्या त्या एकमेव व्यक्ती आहेत.
जगभरातील वृत्तपत्रांनी वाहिलेली श्रद्धांजली …
राणी एलिझाबेथ या ब्रिटन व्यतिरिक्त, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंडसह 15 देशांच्या राजप्रमुख होत्या. त्यांच्या निधनाचे जगभरातील वृत्तपत्रांनी विस्तृत कव्हरेज दिले आहे. ब्रिटनच्या ‘द सन’ या प्रमुख वृत्तपत्राने महाराणी एलिझाबेथ यांची तरुणपण व सध्याचा अशी दोन छायाचित्रे वापरली. यासोबत लिहिले आहे की ‘आम्ही तुमच्यावर प्रेम करत होतो’. त्यांचे निधन हा ऐतिहासिक शासनाचा अंत असल्याचे म्हटले आहे.
ब्रिटिश ‘द मिरर’ने चित्रासह फक्त ‘धन्यवाद’ Thanks You असे लिहिले आहे.
‘डेली एक्सप्रेस’ने राणीच्या छायाचित्रासोबत लिहिलेय, ‘आमच्या लाडक्या राणीचे निधन झाले’. पुढे लिहिले आहे की, ब्रिटनच्या दु:खाने रस्ते कसे भरून गेले होते आणि बकिंगहॅम पॅलेसच्या बाहेर अतीव दुःखातील शोकमग्न जमावाने राणीच्या स्नमानात राष्ट्रगीत गायले.
‘डेली मेल’ने विशेष आवृत्ती काढली. हेडिंग आहे, “आमची ह्रदये तुटली आहेत”. पुढे लिहिले आहे, की “हे अकल्पनीय वाटते. त्या सर्वात हुशार आणि सर्वात दृढ स्त्री होत्या, आमचा मार्गदर्शक, प्रकाश हरपला.”
गार्डियन, आय आणि मेट्रो या ब्रिटिश वृत्तपत्रांनी त्यांचे पहिले पान महाराणी एलिझाबेथच्या नावाने समर्पित केले. ‘द डेली टेलिग्राफ’नेरा णीच्या कृष्णधवल छायाचित्रात म्हटलेय, “दुःख ही प्रेमाची किंमत आहे.”
‘द टाइम्स’ने लिहिले…”डेथ ऑफ द क्वीन” “राणीच्या काळात मोठे सामाजिक, भौतिक आणि तांत्रिक बदल घडले”. वृत्तपत्राने असेही लिहिले आहे की, “आम्हाला माहित असलेली राणी लंडन 2012 ऑलिम्पिकच्या उद्घाटनाच्या वेळी जेम्स बाँडसोबत स्टंटमध्ये सहभागी होण्यास सहमत होईल, यावर कोण विश्वास ठेवेल? सर्वात महत्त्वाचे म्हणजे, वृत्तपत्र लिहिते. “या देशात राजेशाही ती महिला होती.”
ऑस्ट्रेलियाच्या ‘द ऑस्ट्रेलियन’ने म्हटलेय, “गुडबाय प्रिय राणी” Farewell our Nobel Queen. पुढे असे लिहिले आहे की, ब्रिटनमध्ये राणीचा प्रदीर्घ काळ चाललेला कार्यकाळ, ही तिच्या देशाप्रती असलेल्या वचनबद्धतेच्या अतूट भावनेने परिभाषित केली जाऊ शकते.
Shocking : हा मुंबईतला पाऊस पाहिलात का? कधीही पाहिला नसेल असा 15-20 मिनिटांचा पावसाचा खेळ
दी डेली, ग्रीस I Kathimerini
(Η Καθημερινή)
टोरोंटो स्टार, कॅनडा
दी मर्क्युरी, चिली El Mercurio
दी वॅनगार्ड, कोलंबिया La Vanguardia
The State of São Paulo, ब्राझील
O Estadao de Sao Paulo
दी ट्रेड, पेरू El Comercio
डेली ट्रस्ट, नायजेरिया
इकॉनॉमिक जर्नल, हाँगकाँग
信報 – 財經新聞
दी स्टार, मलेशिया
मकाऊ डेली टाईम्स, मकाऊ
गल्फ टुडे, बहारीन
अरब न्यूज, सौदी अरेबिया
दी सिटिझन, दक्षिण आफ्रिका
टाईम्स ऑफ ओमान جريدة عمان
Comments 5