राज्यात काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने गेल्या 2 ते 3 दिवसांपासून राज्याच्या विविध भागात पुन्हा जोर धरला आहे. काही भागात अतिवृष्टी तर काही गावांमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस पडत आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने 11 ऑगस्टपर्यंत कोकण, मुंबई, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रासह पूर्व विदर्भाच्या अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. ( IMD, Monsoon Update in महाराष्ट्र, Heavy Rain )
राज्यात यामुळे मुसळधारची शक्यता..
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यानं आणि अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने त्याचे चक्रवातात रुपांतर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र पुढील 48 तासात तीव्र होत असून, डिप्रेशनमध्ये रुपांतर होण्याची शक्यता असल्यानं राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मुंबईत 100 मिमी पावसाची शक्यता – ऑरेंज अलर्ट..
मुंबईसाठी 9 आणि 10 ऑगस्टला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हे दोन्ही दिवस 100 मिमीहून अधिक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आहे. दरम्यान, कोकणात देखील मुसळधार पाऊस कोसळत आहे.
ॲग्रोवर्ल्ड वाचकांसाठी खास मोबाईल अपग्रेड ऑफर!
हवामान विभागाच्या सुधारित अंदाजानुसार, गुजरात, छत्तीसगड, गोवा, कोकण, मराठवाडा, विदर्भ, तेलंगणा, किनारपट्टी आणि उत्तर कर्नाटक, किनारपट्टी आंध्र प्रदेश, केरळसह अनेक राज्यांमध्ये 11 ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस पडू शकतो. या संदर्भात आयएमडीतर्फे (IMD) अलर्टही जारी करण्यात आला आहे.
स्कायमेट अंदाज..
स्कायमेट वेदर (Skymet Weather) या खाजगी हवामानाचा अंदाज वर्तवणारी संस्था स्कायमेट वेदरचे हवामान शास्त्रज्ञ महेश पलावत यांच्या म्हणण्यानुसार, मान्सूनचा प्रवाह या दिवसांत मध्य भारतात पोहोचला आहे. त्यामुळे उत्तर भारतात सध्या पावसाची तीव्रता कमी राहील.
राज्य, राज्य
तुम्हाला या खालच्या बातम्याही आवडतील. संबंधित बातमीच्या लिंकवर क्लिक करा 👇
Be Alert ! शुक्रवारपर्यंत पुढील 4 दिवस राज्यात पाऊस – पुणे वेधशाळेचा अंदाज … जाणून घ्या सविस्तर
वातावरणात बदल; आता पुढील 4 दिवस राज्यात पाऊस; कोणत्या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अलर्ट ते जाणून घ्या…
Comments 2