पुणे (प्रतिनिधी) – बंद असलेल्या साखर कारखान्यामुळे शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक राहू नये म्हणून राज्यातील बंद असलेले 40 साखर कारखाने तातडीने सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
राज्यात या गाळप हंगामात उसाचे क्षेत्र जास्त झाल्यामुळे बंद असलेल्या साखर कारखान्यामुळे शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक राहू नये म्हणून राज्यातील बंद असलेले 40 साखर कारखाने तातडीने सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, अशी माहिती सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी दिलीय.
उसाचे क्षेत्र जरी मोठ्या प्रमाणावर वाढले असले तरी ऊस गाळपाविना राहणार नाही, असा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. या महिन्यात साखर कारखाने सुरू होतील, काही कारखाने तर दसऱ्याच्या शुभ मुहूर्ताच्या निमित्ताने सुरु झाल्याची माहिती आहे.
उसाचा 100 टक्के गाळपाचा विश्वास
राज्यात गेल्या वर्षापासून आणि यावर्षीही जवळपास दोन लाख मेट्रिक टनाचे अधिक उत्पादन झाले आहे आणि तितकीच उसाची लागवड झाली आहे. त्यामुळे या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाचे 100 टक्के गाळप व्हायला पाहिजे, असा ठोस मानस महाविकास आघाडीने, सहकार खात्यानं बांधला होता. यातून महाराष्ट्र मध्ये बंद पडलेले साखर कारखाने लवकरात लवकर सुरु कसे होतील, यावर बैठक झाली. राज्य शासनाच्या नियोजनानुसार यंदा बंद पडलेले 40 साखर कारखाने विक्रमी आकड्यात सुरु होण्याच्या टप्प्यावर आहेत. या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाचे 100 टक्के गाळप होईल आणि उसाला हे सगळे कारखाने योग्य दर देतील याची जबाबदारी सहकार खात्याच्या माध्यमातून आम्ही घेऊ, असा विश्वासही विश्वजित कदम यांनी बोलून दाखवला आहे.
राज्य शासनाने चांगला निर्णय घेतलाय.तसेच ऊसतोड मजूरांनी पैसे मागीतल्यास कारवाईचे संकेत दिलेत.पण तशी अंमलबजावणी होणेस विनंती.
Jalgaon district madhil pn aakhar karkhane shasnane chalu kravit hich aamchi echha aahe