सन 2023 हे गेल्या दोन शतकातील सर्वाधिक उष्ण वर्ष ठरलं आहे. या वर्षाने उष्णतेचा गेल्या 174 वर्षांतील रेकॉर्ड मोडून काढलाय. जागतिक हवामानशास्त्र संघटना, WMO ने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालातून ही बाब समोर आली आहे.
2023 मध्ये जागतिक सर्वसाधारण तापमानात 1.45 अंश सेल्सियसची वाढ नोंदवली गेली. त्याआधी 2016 मध्ये 1.29 अंश आणि 2020 मध्ये 1.27 अंश सेल्सियस इतकी सर्वाधिक तापमान वाढ नोंदवली गेली होती. औद्योगिक क्रांतीपूर्वी 1850 मध्ये याहून अधिक तापमान वाढ नोंद होती.
हरित वायूंचं वाढलेलं प्रमाण आणि ‘एल निनो’ यांचा हा एकत्रित परिणाम असल्याचं ‘डब्ल्यूएमओ’नं म्हटलं आहे. 2022 मध्ये पॅसिफिक महासागरातील ‘ला निना’चं 2023 मध्ये ‘एल निनो’मध्ये झालेलं स्थित्यंतर या असामान्य तापमानवाढीला मुख्यत: कारणीभूत ठरलं आहे. सन 2099 अखेरसाठी निर्धारित करण्यात आलेल्या 1.5 अंश सेल्सियस या तापमानवाढीच्या जवळ आपण अवघ्या 23 वर्षांतच पोहचलो असल्याने ही सर्व देशांसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.
2023 मध्ये दररोज महासागरांचे 32 टक्के क्षेत्र सामुद्री उष्णतेच्या लाटांनी प्रभावित झाले. याशिवाय, समुद्राची पातळी उच्चांकी; तर अंटार्क्टिकामधील हिवाळ्यातील बर्फाचा विस्तार नीचांकी नोंदवला गेला.
- अल्प खर्चातील फायदेशीर सेंद्रिय शेतीबाबत अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनात जळगावात 30 नोव्हेंबरला चर्चासत्र…
- कृषी प्रक्रिया उद्योग व शासकीय योजनांबाबत अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनात जळगावात 30 नोव्हेंबरला चर्चासत्र…
- मका – एकरी 100 क्विंटल उत्पादनाबाबत अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनात जळगावात 29 नोव्हेंबरला चर्चासत्र…
- हिमाचल सरकारचा अनोखा उपक्रम ; पशुपालकांकडून 3 रुपये किलोने शेण खरेदी !
- नोकरी सोडून सुरु केला दुग्धव्यवसाय ; आता 2 कोटींची उलाढाल