मुंबई : देशातील 13 कोटी शेतकऱ्यांना आनंदाची बातमी लवकरच मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहार दौऱ्यावर असताना ही गोड बातमी त्यांच्या कानावर पडणार आहे. पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होईल, याची शेतकऱ्यांना मोठी उत्सुकता आहे, आणि आता त्यांची ही प्रतिक्षा संपणार आहे. या दिवशी 2000 रुपये त्यांच्या खात्यात जमा झाल्याचा संदेश येईल. पण, शेतकऱ्यांनी लक्षात ठेवावं की हप्ता खात्यात जमा होण्यासाठी काही महत्वाची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. जर हे कार्य योग्यरित्या पूर्ण केले नाही, तर हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार नाही. केंद्र सरकार पीएम किसान योजनेतंर्गत प्रत्येक शेतकऱ्याला दरवर्षी 6000 रुपये आर्थिक सहाय्य पुरवते. त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेच्या सर्व अटी आणि नियमांची काळजीपूर्वक तपासणी केली पाहिजे, जेणेकरून त्यांना फायदा मिळवता येईल.
देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनाच्या माध्यमातून आर्थिक लाभ मिळतो. सरकार प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात तीन वेळा 2000 रुपये जमा करते. आतापर्यंत या योजनेचे 18 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. आता शेतकऱ्यांना 19 व्या हप्त्याची प्रतिक्षा आहे, आणि ही रक्कम याच महिन्यात त्यांच्या खात्यात जमा होईल. पण, शेतकऱ्यांना ही रक्कम मिळण्यासाठी काही आवश्यक प्रक्रियांची पूर्तता करणे आवश्यक आहे. जर हे काम योग्यरित्या न केले, तर योजनेचा लाभ त्यांना मिळणार नाही. त्यामुळे, शेतकऱ्यांनी त्यांच्या खात्याची माहिती अद्ययावत केली पाहिजे आणि कोणतीही त्रुटी किंवा चुकलेली माहिती दुरुस्त केली पाहिजे.
या तारखेला मिळणार हप्ता
पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 फेब्रुवारी रोजी बिहार दौऱ्यावर जात आहेत, आणि या दिवशी ते प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करतील. याविषयीची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे. या हप्त्याचा लाभ देशातील जवळपास 13 कोटी शेतकऱ्यांना मिळणार आहे. 2000 रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, ज्यामुळे त्यांना आर्थिक मदतीचा फायदा होईल.
ई-केवायसी आवश्यक
जर शेतकऱ्यांनी सरकारच्या गाईडलाईन्सचे पालन केले नाही, तर 19 वा हप्ता त्यांच्या खात्यात जमा होणार नाही. पीएम किसान योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे, कारण यासाठी नियमानुसार ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्यासाठी पीएम किसान योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर (pmkisan.gov.in) जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. यामध्ये त्यांच्या वैयक्तिक माहितीची पुष्टी केली जाते. पीएम किसान योजनेतंर्गत केंद्र सरकारने काही महत्त्वाचे नियम बदलले आहेत. नवीन नियमांनुसार, एकाच कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा, मुलगी सर्व लाभ घेत असतील, तर आता फक्त एकालाच लाभ मिळेल.
![](https://i0.wp.com/eagroworld.in/wp-content/uploads/2024/02/Jain-web2.jpg?resize=496%2C489&ssl=1)