मुंबई : केंद्र सरकारने जारी केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत सरकारने लाभार्थ्यांना 17 वा हप्ता जारी केला आहे आणि आता सर्वजण 18 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. लवकरच पंतप्रधान किसान योजनेचा 18 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाणार आहे.
या योजनेचा 17 वा हप्ता सरकारने 18 जून 2024 रोजी लाभार्थ्यांसाठी जारी केला आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता DBT द्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केला जाईल. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेंतर्गत, लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्षभरात 3 हप्त्यांमध्ये 6000 रुपये पाठवले जातात. या योजनेच्या रकमेतून देशातील शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून शेतीशी संबंधित अत्यंत महत्त्वाचा खर्च भागवण्यास मदत केली जाते.
2024-2025 या आर्थिक वर्षाचा दुसरा हप्ता जारी करण्यात आला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 18 वा हप्ता लवकरच म्हणजेच 5 ऑक्टोबर 2024 रोजी DBT द्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जारी केला जाईल. येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर 5 ऑक्टोबर 2024 रोजी पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत केंद्र सरकार 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये वर्ग करणार आहे.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 👇