• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

पावनखिंड भाग – 5 बाजी प्रभू – इतिहास सन्मानाचा, अभिमानाचा, अतुल्य पराक्रमाचा

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 20, 2020
in इतर
0
पावनखिंड भाग – 5  बाजी प्रभू – इतिहास सन्मानाचा, अभिमानाचा, अतुल्य पराक्रमाचा
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

राजगडावर शिवाजीराजांच्या सदरेत, राजांचे खासे लोक गोळा झाले होते. त्यांत नेताजी पालकर, गोदाजी जगताप, वाघोजी तुपे, हिरोजी हिंगळे, सिदोजी पवार, महाडिक, मालुसरे, मोरोपंत ही मंडळी नजरेत येत होती. शिवाजीराजे आपल्या आसनावर बसले होते. राजांचे दिवाण शामराज नीळकंठ, बांदलांचा खलिता वाचत होते. शिवाजीराजांचा खलिता घेऊन गेलेले आबाजी विश्वनाथ राजांच्या शेजारी उभे होते. आबाजी विश्वनाथ हे राजांच्या अनेक हेरांपैकी एक हेर…

बांदलांचा खलिता वाचून होताच राजांच्या मुखावर स्मित उमटलं. ते म्हणाले,
‘ठीक आहे ! जगदंबेची इच्छा ! आम्ही सामोपचारानं माणसं गोळा करू पाहतो आणि ही माणसं वाकड्यात शिरतात. बांदल सांगतील, ते ऐकायलाच हवं. उद्या जायचं, ते आजच जाऊ !’
राजांचा तो निर्णय ऐकून साऱ्यांच्या चेहऱ्यांवर उत्साह प्रगटला.
राजांचं लक्ष आबाजी विश्वनाथाकडं गेलं.
त्यांनी विचारलं, ‘आबाजी, रोहिड्याची काय हालत आहे ?’
‘राजे ! गड तसा मजबूत नाही. बांदलांचा दिवाण बाजीप्रभू हा कुशाग्र बुद्धीचा धारकरी आहे. एका हाकेबरोबर हिरडस मावळ उभा करण्याची त्याची ताकद आहे. पण गडावर मात्र बेदिली आहे.’

 


‘बेदिली ?’
‘जी ! कृष्णाजी बांदल हा मोठा लहरी आहे. त्याच्या भोवती खुशमस्कऱ्यांचा गराडा असतो.’
‘गल्लत होते, आबाजी ! याच बांदलांनी जेध्यांचा पराभव केला, हे विसरू नका.’
‘त्यालासुद्धा एक कथा आहे.’
‘कसली कथा ?’
‘जेव्हा जेधे-बांदलांचं वैर पेटलं, तेव्हा बांदलांना यश येर्इना. कृष्णाजी बांदलांची स्त्री दीपाबार्इ बांदलांच्या गैरमर्जीमुळं कैदेत होती. तिला बेड्या घातल्या होत्या. ती साध्वी होती. जेधे-बांदल लढार्इत यश येर्इना, तेव्हा वडिलधाऱ्या माणसांनी, दीपाबार्इची बेडी तोडून तिला सन्मानानं वागवावी, म्हणजे यश प्राप्त होर्इल, असं सांगितलं. कृष्णाजी बांदलानं तसं केलं. दीपाबार्इचा आशीर्वाद घेतला आणि बांदलांनी जेध्यांचा पराभव केला. ही कथा गडावर मशहूर आहे.’
‘असेल ! साध्वीच्या आशीर्वादाचं माहात्म्य आम्ही नाकारीत नाही. रावण दुष्ट असला, तरी त्याची पत्नी मंदोदरी साध्वी होतीच ना ! आबाजी, गडाची हालत काय आहे ?’
‘गड तसा भारी नाही. दक्षिणेची बाजू दुर्लक्षित आहे. गडाभोवती मेटे नाहीत.’

 


‘ते कसं कळलं ?’
‘एके रात्री दोन चंद्रमे दिले आणि गडाच्या पहारेकऱ्यांनी मला रात्री गडाचे दरवाजे उघडून खाली जाऊ दिलं.’
‘छान केलंत. आता उसंत नाही. बिचारे बांदल आणि त्यांचे दिवाण बाजी आमची वाट पाहत असतील.’
नेताजी पालकर आवेशानं उठले. त्यांनी राजांना मुजरा केला.
‘काय ! काय बेत ?’ राजांनी विचारलं. ‘राजे, ही कामगिरी मला द्यावी !’
‘नाही.’ नकारार्थी मान हलवीत राजे म्हणाले, ‘बांदलांनी आम्हांला आव्हान दिलं आहे. ही कामगिरी आम्हांलाच पार पाडायला हवी.’
नेताजी काही बोलण्याचा प्रयत्न करीत असता राजे त्यांना म्हणाले,
‘काका, आठवतं ? जावळीच्या मोऱ्यांनी आम्हांला असाच निरोप पाठविला होता. त्यासाठी आम्ही ती मोहीम स्वीकारली होती. बांदलांचा समाचार आम्ही जातीनं घेऊ.’
आपल्या आसनावर बसलेले दादोजी कोंडदेव म्हणाले,
‘राजे, आपला निर्णय योग्य आहे. दोन दिवसांवर अमावस्या आली आहे. ती पार पडली की, मोहीम हाती घ्यावी.’


‘नाही, दादोजी ! अमावास्येचं भय आम्हांला नाही. तुम्हीच आमची मुद्रा तयार केलीत ना ! *प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववन्दिता । साहसूनो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।*
प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वृद्धगिंत होत जाणारी, विश्वानं वंदिलेली अशी शहाजीपुत्र शिवाची मुद्रा लोक कल्याणास्तव मानानं नांदते आहे. दादोजी, तो प्रतिपदेचा विजय घरी आणायचा झाला, तर त्याला अमावास्येलाच बाहेर पडायला हवं ! अमावास्या, प्रतिपदा, पौर्णिमा आम्हांला नेहमीच फलदायी ठरलेली आहे.’
राजे आसनावरून उठले. ते सदरेवर नजर फिरवीत होते.
‘आबाजी, तुम्ही गडाचे माहितगार. तुम्ही, नानाजी, येसाजी, जगताप, पवार, मालुसरे—तुम्ही सर्वांनी योग्य ती माणसं गोळा करा. आम्ही ही गोष्ट मासाहेबांच्या कानांवर घालून परत सदरेवर येऊ.’
राजे सदरेतून उठून वाड्यात गेले.
रात्र वाढत होती. रोहिडा किल्ल्यात बांदलांच्या वाड्याशेजारी असलेल्या घरात बाजी-फुलाजींचा मुक्काम होता. अचानक फुलाजींना जाग आली. त्यांचं लक्ष चौपार्इच्या खाली गेलं.

बाजींचं हंतरूण मोकळं होतं. बाहेरच्या सोप्यात टेंभे जळत होते.
फुलाजींनी हाक मारली.
‘बाजी ऽ ’
‘जी !’ म्हणत बाजी आत आले.
‘झोपला नाहीस ?’
‘काय झालं, कुणास ठाऊक ! झोपच लागेना. त्यात अमावास्या. घुबडांनी तर वैताग आणलाय्.’
‘वडावर त्यांची वस्तीच आहे. बिचारी आवाज देणारच !’
त्याच वेळी घुबडांचा घूत्कार परत ऐकू आला. पाठोपाठ एक कोकिळा ओरडली.
‘ऐका ! पण हा घुबडाचा आवाज नव्हे आणि या दिवसांत कोकिळा ओरडते ?’
अर्धवट झोपेतल्या फुलाजींची झोप उडाली.
‘रखवालाऽऽ’ रखवाल्याची आरोळी कानांवर आली. घुंगूर लावलेल्या काठीचा आवाज उठला.
फुलाजी हसले.
‘काही तरी मनात आणू नको. तुला भास झाला असेल. झोप तू. सगळं ठीक आहे.’
बाजींनी भावाची आज्ञा मानली आणि ते निजले. पण डोळे मिटूनही डोळ्यांत झोप उतरत नव्हती. मनाची हुरहूर वाढत होती.
सौजन्य :- सर्व क्रमशः लेख ( श्री. सागर पाटील – सोशल मिडिया )
🚩क्रमशः🚩

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: औरंगजेबकृष्णाजी बांदलछत्रपतीधारकरीनिजामशाहीपावनखिंडबाजी प्रभूमावळमोगलराजगडशिलेदारशिवाजी महाराजस्वराज्य
Previous Post

थेट मेळघाटातून… आदिवासींच्या आदर्श रीतीपद्धती

Next Post

शेतीची जाण आणि शेतकऱ्यांची जाणीव असणारे अधिकारी -सुनील केंद्रेकर

Next Post
शेतीची जाण आणि शेतकऱ्यांची जाणीव असणारे अधिकारी -सुनील केंद्रेकर

शेतीची जाण आणि शेतकऱ्यांची जाणीव असणारे अधिकारी -सुनील केंद्रेकर

ताज्या बातम्या

मान्सून पुन्हा सक्रिय होणार

मान्सून पुन्हा सक्रिय होणार; राज्याच्या काही भागात आज पुन्हा मुसळधार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

राज्यात थंड

राज्यात थंड, बोचरे वारे! आरोग्याला फायदा की नुकसान? जाणून घ्या …

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

दुग्धव्यवसाय कार्यशाळा

बुकिंगची आज शेवटची संधी…; पुढची दुग्धव्यवसाय कार्यशाळा पुढच्या वर्षी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 23, 2025
0

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज; 25 ऑगस्टला कमी दाबाचे नवे क्षेत्र, महाराष्ट्रात पाऊस सुरूच राहणार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 22, 2025
0

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा 2)

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

आज 20 ऑगस्ट 2025

आज 20 ऑगस्ट 2025 : जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अकोला, बुलढाणा, छ. संभाजीनगर, जालनाची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

महाराष्ट्रासह देशभरातील पावसाची स्थिती

आज 20 ऑगस्ट 2025 : महाराष्ट्रासह देशभरातील पावसाची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

5 म्हशीपासून 120 म्हशीपर्यंतचा प्रवास...??

5 म्हशीपासून 120 म्हशीपर्यंतचा प्रवास…??

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

दुग्धव्यवसायासाठी अनुदान

दुग्धव्यवसायासाठी अनुदान… वैयक्तिक ₹ 10 लाख तर सामूहिक ₹ 3 कोटींपर्यंत..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 19, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

मान्सून पुन्हा सक्रिय होणार

मान्सून पुन्हा सक्रिय होणार; राज्याच्या काही भागात आज पुन्हा मुसळधार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

राज्यात थंड

राज्यात थंड, बोचरे वारे! आरोग्याला फायदा की नुकसान? जाणून घ्या …

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

दुग्धव्यवसाय कार्यशाळा

बुकिंगची आज शेवटची संधी…; पुढची दुग्धव्यवसाय कार्यशाळा पुढच्या वर्षी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 23, 2025
0

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज; 25 ऑगस्टला कमी दाबाचे नवे क्षेत्र, महाराष्ट्रात पाऊस सुरूच राहणार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 22, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.