नवी दिल्ली – रासायनिक खताच्या वाढत्या वापरामुळे पुन्हा एकदा सेंद्रीय शेतीचे महत्व वाढत आहे. सेंद्रीय शेती हा तर केंद्र सरकारच्या अजेंड्यावरचा विषय आहे. याकरिता दोन वेगवेगळ्या योजना राबवल्या जाणार असून उत्पादन वाढीसाठी आवश्यक त्या साधनसामुग्रीसाठी प्रोत्साहनही दिले जाणार आहे. एवढेच नाही तर शेतकऱ्यांना 50 हजार रुपये मदत करुन क्षेत्र वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.
🥭 आपल्याला अस्सल देवगड हापूस उपलब्ध करून देण्यासाठी अॅग्रोवर्ल्डची टीम निघाली कोकणच्या दिशेने..
गेल्या काही दिवसांपासून उत्पादन वाढीसाठी रासायनिक खताचा वापर वाढत आहे. यामुळे मानवी आरोग्यास धोका निर्माण तर झाला आहे. त्यामुळे सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करीत आहे. आता तर या सेंद्रिय शेतीमसाठी दोन योजना राबवल्या जाणार असल्याचे केंद्रीय कृषी कल्याण राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी लोकसभेत सांगितले.
या आहेत दोन योजना..
शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून 2015-16 पासून या दोन योजना सुरु करण्यात आल्या आहेत. यामध्ये पारंपरिक कृषी योजना आणि ईशान्य भागातील शेतकऱ्यांसाठी मिशन ऑर्गेनिक व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट या योजनांचा समावेश असणार आहे. या योजनांच्या माध्यमातून पीक पेरणी करण्यापासून ते कापणी आणि पाण्याचे योग्य व्यवस्थापन असे विषय असणार आहेत. सेंद्रीय शेती वाढवण्यासाठी केंद्राचा प्रयत्न असला तरी शेतकऱ्यांनाही तेवढाच फायदा होणार आहे.
अशी आहे केंद्राची भूमिका
सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी पारंपरिक कृषी विकास योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये आणि 3 वर्षांसाठी तात्पुरती मदत करणार असल्याचे कृषी कल्याण मंत्री कैलास चौधरी यांनी सांगितले. त्यामुळे हेक्टरी 31 हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. त्याचबरोबर मिशन ऑर्गेनिक व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट याअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्याचे कोणतेही कर्ज, दर्जेदार बियाणे, प्रक्रिया आणि इतर कामांसाठी हेक्टरी 46 हजार 575 रुपये प्रति हेक्टर 3 वर्षांसाठी दिले जाणार आहेत.
हापूसच्या नावाने विक्रेते करताहेत ग्राहकांची फसवणूक..
सेंद्रिय उत्पादनांच्या निर्यातीत 6 पट वाढ
सेंद्रीय पध्दतीचा अवलंब करुन उत्पादन वाढ केली जात आहे. असे असले तरी सध्या सेंद्रीय उत्पादनाची निर्यात न करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पण जगभरात भारतीय सेंद्रीय शेतीची वेगळी ओळख आहे. त्यामुळे इंडिया ऑर्गन हे ब्रॅंड सध्या जगात लोकप्रिय ठरत आहे. 2013 साली सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून 1 लाख 77 हजार टन शेतीमालाचे उत्पादन झाले होते तर यंदा ते 8 लाख 8 हजारावर पोहचले असल्याचे मंत्री कैलाश चौधरी यांनी सांगितले आहे.
I like it
I want to genrate good fruits