मुंबई – शेतीला आधुनिकतेची जोड देणे, विकेल ते पिकेल अभियानाला बळकटी देण्यासह रोग, किडीचा प्रादुर्भाव रोखण्याबरोबर अतिवृष्टीचा सामना करण्यासाठी यंत्रणेने सतर्क रहावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
मुंबई येथे आज सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या खरीप आढावा 2022 च्या बैठकीदरम्यान ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह इतर मंत्री तसेच संबंधित वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री यांच्या भाषणाचे ठळक मुद्दे..
▪️विकेल ते पिकेल अभियान यशस्वी करण्यासाठी शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करा.
▪️शेतकरी आपल्या कुटूंबातील घटक असून यंत्रणेने आपुलकीने कुटुंबासारखे काम करावे.
▪️ आरोग्यासाठी पोषक गुणधर्म असणारे बियाणे शेतकरी बांधवाना मोफत देणारे,
शेतकऱ्यांचा आरोग्याचा विचार करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य
▪️शेतमालाला हमीभाव आहेच पण हमखास भाव मिळाला पाहिजे.
▪️पीक विमा योजना समाधानकारक नाही. राज्य सरकारच्या पाठपुराव्याला यश मिळते आहे असे दिसते. केंद्र सरकार त्यावर विचार करत आहे ही चांगली बाब आहे
▪️यंदा चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. कृषी विभागाने उत्तम नियोजन केले आहे. पूर्व तयारी समाधानकारक आहे. त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम यशस्वी होईल, असा मुख्यमंत्र्यांनी विश्वास व्यक्त केला.