• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

शेतकऱ्यांची हक्काची बाजारपेठ

Team Agroworld by Team Agroworld
December 29, 2020
in इतर
0
शेतकऱ्यांची हक्काची बाजारपेठ
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

काही व्यक्ती, संस्था या आपल्या कामकाजाच्या पद्धतीमुळे, आपल्या  उद्दिष्टांमुळे वेगळ्या ठरतात. त्यांचे काम पथदर्शी स्वरूपाचे ठरते, अनेकांना अनुकरणीय ठरते. सहकाराच्या चळवळीने आता किती व्यापक स्वरूप  प्राप्त केले आहे, हे आपण अनुभवतोच आहोत. पुण्यातील श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड या कंपनीने, शेतकर्‍यांच्या मालाला चांगला
भाव देण्याची व्यवस्था करून शहरी ग्राहकांनाही अत्यंत चांगला शेतीमाल  रास्त भावाने देण्याची किमया आपल्या आठवडे बाजार या उपक्रमाद्वारे साधली आहे. त्यांच्या या उपक्रमाची दखल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बात या कार्यक्रमातून नुकतीच घेतली. संपूर्ण भारतभर अनुकरणीय अशा या उपक्रमाचा घेतलेला हा आढावा..
पुणे, मुंबईसारख्या महानगरांमध्ये आठवडे बाजाराच्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या शेतीमालाला चांगला भाव मिळवून देण्यात पुण्यातील श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड आघाडीवर आहे. या कंपनीच्या स्थापना तत्त्वाची व एकूण यशाची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या लोकप्रिय मन की बात या केली यातच सारे आले. संपूर्ण जगासाठीच अत्यंत कठीण काळ असलेल्या कोरोनाच्या भीषण आणि न भूतो न भविष्यति अशा साथीच्या काळातही या उपक्रमाने आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे.


स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी आकडेवारीत
या सार्‍या घडामोडींचा व आपल्या आजवरच्या यशाचा लेखाजोखा घेताना श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेडचे अध्यक्ष नरेंद्र पवार सांगतात- आम्ही ही अभिनव संकल्पना 2010 शेतकर्‍यांसह, शेतकर्‍यांसाठी राबवत आहोत. 2014 पासून कृषी पणन मंडळाच्या सहकार्य आणि मार्गदर्शनामुळे अधिकाधिक शेतकरी आणि ग्राहक ही साखळी वृद्धिंगत करू शकलो आहोत. देशाच्या पंतप्रधानांनी आमच्या या कामाची दखल घेतली, ही आमच्या यशाची पावती आहे. अहमदनगर, पुणे, सातारा जिल्ह्यातील अंदाजे 4500 शेतकरी व 750 तरुणांना आम्ही रोजगार उपलब्ध करून देतो. थेट शेतमाल विक्रीतून वार्षिक 100 कोटी रुपयांची उलाढाल करतो आहोत. एकूण 24 आठवडे बाजारांतून वार्षिक 25 हजार टन शेतमालाची आम्ही विक्री करतो.
साधारणपणे पुणे शहराच्या अवतीभवतीची 70 गावे आमच्याकडे नोंदणी झाली आहेत व त्यातून एकूण 750 ग्रामीण भागातील मुलांना आमच्यामार्फत रोजगार मिळाला आहे. या व्यवस्थेद्वारे मालाच्या चढ-उताराचीही व्यवस्था केली जाते. चांगल्या प्रतिसादामुळे आम्ही सुमारे 220 पिकअप व्हॅन्स विकत घेतल्या. वर्षाला 24 आठवडे बाजारामध्ये सुमारे 100 टन भाजीपाला दैनंदिन विकतो. यातून 100 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल आम्ही करतो. शेतकरी व ग्राहकहित जोपासल्यामुळेच हे यश मिळाल्याचे पवार सांगतात.
पंतप्रधानांनी या संकल्पनेचं कौतुक केले ही चांगलीच गोष्ट आहे. मात्र  आम्ही हा उपक्रम एक चळवळ म्हणून राबवतो आहोत. ही व्यवस्था शेतकर्‍याच्या मालकीची व हिताची काळजी घेणारी व शेतकर्‍यांचे नियंत्रण असणारी असावी, असा उद्देश या उपक्रमामागे आहे. सुरुवातीला या उपक्रमाची सुरूवात करण्यासाठी छोट्या- छोट्या शेतकर्‍यांचे गट तयार केले. ग्रामीण भागातील
जी मुले आहेत, त्यांनी शहरात येऊन या शेतमालाची विक्री करावी व शहरातून मिळालेला पैसा ग्रामीण भागापर्यंत, ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये यावा हा या संकल्पनेचा आत्मा आहे. ही संकल्पना विकसित करण्यासाठी आम्ही सुरुवातीला शेतकर्‍यांना, गटांना घेऊन सोसायट्यांशी संपर्क केला. वेगवेगळ्या गावांतील वेगवेगळे गट घेऊन आम्ही या प्रक्रियेला चालना दिली.
बाजाराचा श्रीगणेशा
वेगवेगळ्या विभागातील शेतमालातील वैविध्य, त्यांचे एकत्रिकरण करणे, त्यांचे व्यवस्थापन करणे तसे अवघड होते. मात्र एका मध्यवर्ती भागातून या प्रक्रियेचे नियंत्रण करणे सोपे जाईल म्हणून 29 जून 2014 कोथरूड येथील गांधीभवन येथून सुरू केली. पूर्वी पारंपरिक भाजीवाल्याप्रमाणे खाली जमिनीवर पोते टाकून माल विक्री केला जायचा. नंतर मात्र आम्ही तो टेबलावर ठेवू लागलो. पारंपरिक वजन काट्याचा वापर सर्रासपणे केला जायचा, मात्र आम्ही इलेक्ट्रॉनिक वजन काटा वापरण्यास सुरुवात केली. विविध गावांच्या गटांची, त्यांच्या मालाची आम्ही वर्गवारी केली व ती लोकांसमोर आम्ही मांडू लागलो. अशा प्रकारे पारंपरिक शेती विक्री व्यवस्थापनातील त्रुटी हेरून त्या आम्ही व्यवस्थेतून काढून टाकू लागलो. याचा चांगला परिणाम आमच्या विक्रीमध्ये दिसू लागला. लोकांचा आमच्यावरील विश्‍वास वाढू लागला. मालाला चांगला डिस्प्ले आणि चांगले विक्री व्यवस्थापन या माध्यमातून आम्हाला ग्राहकवर्गाचा विश्‍वास संपादन करता आला. आणि हेच या योजनेचे यश आहे.
कार्यप्रणाली
आम्ही साधारण शेतकरी कुटुंबातील मुले आहोत. मूळचे आम्ही पुरंदरचे. आम्ही एकूण पाच जण पार्टनर आहोत. आम्हा सर्वांचे एमबीए झाले आहे. शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावावे, त्याला त्याच्या मालाला हक्काची बाजारपेठ मिळावी, ही आम्हा सार्‍यांची इच्छा आहे. शेतकरी आणि त्याची तरुण मुले यांची फक्त आर्थिक स्तर वाढावा, हीच फक्त आमची इच्छा नाही तर या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत, ती चारित्र्यवान व्हावीत, यासाठीही आम्ही प्रयत्न सुरू ठेवले. तंबाखू खाल्ली तरी आम्ही शेतकर्‍याला पाचशे रुपयांचा दंड करतो, ते याचसाठी. सर्वांमध्ये समभाव निर्माण होण्यासाठी व या उपक्रमाच्या ब्रँडिंगसाठी आम्ही ड्रेसकोड तयार केला. ग्राहकांशी वागण्या-बोलण्याची आचारसंहिता तयार केली. यामुळे आमचा पीपल कनेक्ट वाढला. आमची सर्विस लोकांच्या पसंतीस उतरली व त्यांचा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळू लागला. चांगली सेवा देऊन आम्ही फक्त स्वतःलाच विधायकरीत्या बदलले नाही, तर समाजातही एक चांगला बदल घडवून आणला.या सर्व व्यवस्थेमध्ये एकसूत्रता आणण्यासाठी आम्ही साधारणपणे वीस शेतकर्‍यांचा एक गट केला. त्यातील 12, 13 लोक शेती करतात तर उर्वरित लोक विक्री करतात. हे विक्रीचे काम करताना या
मंडळींना रोजचा रोजगार द्यायला हवा, त्यांना रोजचे उत्पन्न हवे. हे मूळ उद्दिष्ट ठरवून आम्ही त्याभोवती विक्रीचे जाळे विणले आहे. एका बाजारात सुमारे 50 स्टॉल्स असतात. त्यांमध्ये भाजीपाला, कडधान्ये, फळे आदींचे स्टॉल असतात. अशा 50 गटांची एक साखळी आम्ही बनवली. अशा साखळीद्वारे संपूर्ण आठवडे बाजाराचे व्यवस्थापन पाहिले जाते. 50 गटांची एक साखळी, अशा
सध्या 4 साखळ्या कार्यरत आहेत. पुण्यामध्ये 12 साखळ्या तर मुंबईत 12 साखळ्या सुरू आहेत. मुंबईत लालबाग, परेल, दादर, वरळी, माटुंगा, मुलुंड, घाटकोपर, चेंबूर येथे या साखळ्या कार्यरत आहेत.


पारंपरिक ते अत्याधुनिक शेती
या प्रकल्पाद्वारे पारंपरिक शेतकर्‍याची जी अगतिक, दरिद्री अशी प्रतिमा होती, ती आम्ही स्वच्छ केली. शेतकरीसुद्धा चांगल्याप्रकारे, अत्याधुनिक पद्धतीने शेती करू शकतो, नफा मिळवून आपले आर्थिक स्वातंत्र्य मिळवू शकतो, ही दृढ भावना आम्ही शेतकर्‍यांच्या मनात निर्माण केली. आणि हेच या उपक्रमाचे मोठे यश आहे. यापुढील आव्हानांबाबत बोलताना …. म्हणाले की मागणी- पुरवठा याचे गणित बसविण्यासाठी आम्ही बॅकएन्डला एक अ‍ॅप तयार केले आहे, की जे मागणी-पुरवठा साखळीवर चांगले लक्ष ठेवून असते. एखाद्या भागात एखाद्या विशिष्ट मालाची मागणी किती असते, तिथे किती माल सहज खपला जातो, याचे आमचे असे निरीक्षण असते. त्यानुसार आम्ही सप्लाय चेन विकसित करतो व या अ‍ॅपवरील माहितीचा वापर करून आम्ही शेतकर्‍यांना विशिष्ट पिकाच्या लागवडीसाठी सल्ला देतो. म्हणूनच आमच्या आठवडे बाजारात भाज्यांची, कडधान्यांचे वैविध्य असते. जमिनीच्या प्रतवारीपासून शेतकर्‍यांना त्यांच्या शेतमालाच्या विक्रीपर्यंत आम्ही शेतकर्‍यांच्या मागे खंबीरपणे उभे असतो. म्हणूनच या उपक्रमाचा आत्मा असलेल्या शेतकर्‍यांचा आमच्यावर दृढ विश्‍वास बसलेला आहे आणि तो यापुढेही निरंतर राहावा, यासाठी आमची टीम
सतत कार्यरत असते.  पिकवलेल्या ठिकाणीच शक्यतो मालाची विक्री झाली तर ही गोष्ट नफ्यासाठी योग्यच ठरते. त्यामुळे मालाची प्रतवारी करणे, त्याची विक्री करणे या सुविधा आम्ही तालुका पातळीवरच उपलब्ध करून देतो व शेतकर्‍यांनाही ही बाब फायद्याची ठरते. सोरतापवाडीत आम्ही या प्रकारचे केंद्र सुरू केले आहे. या केंद्रात मालाचे ग्रेडिंग होते, त्याचे पॅकिंग होते व तिथून पुढे तो शहरात विक्रीला जातो.
शासकीय सहकार्य
      सरकारी अधिकार्‍यांनी, कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी केलेली मदत आम्हाला खूप मोलाची ठरली. प्रथम शेतकर्‍याला खासगीरीत्या मालाची विक्री करण्याची बंदीच होती. मात्र केंद्र सरकारने आणलेल्या कायद्यांनी ही बंदी उठली. आम्ही सरकारी योजनांमध्ये जसजसे बदल होत गेले, त्यानुषंगाने आम्ही आमची धोरणेही बदलली व या योजनांचा चांगला फायदा करून घेतला. सर्वांना बरोबर घेऊन काम केल्याचा आम्हाला चांगला फायदा झाला. सर्वांना बरोबर घेऊन काम करणे, सर्वांचा फायदा करून देणे हा या उपक्रमाचा आत्मा होता. अगदी मन की बातमध्येही आम्ही आमचे नाव सुचवले नव्हते. ते कृषी आयुक्तांना, एसईओना फोन आला होता व त्यातूनच आम्हाला ही संधी मिळाली.सरकारी अधिकार्‍यांनी मात्र आपल्या रूढ पॅटर्ननुसार काम न करता
अनौपचारिकरीत्या आम्हाला खूप मदत केली. त्यांची जागा देण्याची मदत फार मोलाची ठरली. कुमार सप्तर्षी यांनी गांधी भवनला प्रथम जागा दिली. आमची योजना पाहून, तिची उपयुक्तता पाहून अनेकांनी, खासदार सुप्रियाताई सुळे यांच्यासह अनेकांनी आम्हाला फ्रीमध्ये जागा दिली. या मदतीवरच आम्ही पुढची गगन भरारी घेतली. या उपक्रमाचे यश त्यांच्या कामकाजातील पारदर्शीपणात व आपले काम सातत्याने सुधारेल कसे, याकडे लक्ष देण्यात आहे, असे स्तुतिपर उद्गार राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी काढले आहेत.


पुण्या-मुंबईत आता आमचे सुमारे 1 लाख 60 हजार कायमचे ग्राहक आहेत, ज्यांना या उपक्रमाचे महत्त्व पटलेले आहे आणि आता ते आमचे कायमचे ग्राहक आहेत. ही फार मोठी उपलब्धी आम्ही मिळविली आहे. एक मात्र खरे की यंत्रणा उभी राहिली की पैशांचा प्रवाह तुमच्याकडे येतो, मात्र पैशांसाठी यंत्रणा उभी राहत नाही. तुमच्या यंत्रणा पूर्णतया पारदर्शी ठेवावी लागते. कारण
तुम्ही एखादी गोष्ट समोरच्यापासून लपविली, की समोरचाही अनेक गोष्टी तुमच्यापासून लपवायला लागतो. आणि ही गोष्ट व्यवसायासाठी खूपच हानीकारक आहे. लोकांशी आम्ही आमच्या या उपक्रमाद्वारे जोडले गेलो. कोरोना काळातही आम्ही ही सर्व्हिस सुरू ठेवली आणि आमच्या एकाही कर्मचार्‍याला कोरोना झाला नाही हे विशेष. ग्रामीण भागातही शेतीमालासह अन्य काही गोष्टी तयार होतात. त्यांनाही आम्ही आमच्या बाजारात स्थान दिले. कितीतरी महिला बचतगटांनी आमच्या आठवडे बाजारातून आपली उलाढाल वाढविली आहे.

आमचा हा सारा प्रवासच अविस्मरणीय आहे. एका शून्यातून सुरू झालेला हा प्रवास आता पूर्णत्वाकडे वाटचाल सुरू आहे. नवनवी आव्हाने आता आम्हाला खुणावू लागली आहेत. शेतकर्‍यांसाठी आम्ही काहीतरी करतोय, त्यांच्या प्रगतीसाठी आम्ही उपयोगी पडतोय ही भावनाच आम्हा सर्वांना पुढे नेणारी आहे.
टीम
श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी लि
नरेंद्र पवार, वाल्हे, पुरंदर
गणेश सवाणे, शेटफळ गढे, इंदापूर
तुषार अग्रवाल, साखर खेर्डा, सिंदखेड राजा
ऋतुराज जाधव, रुई, बारामती
राजेश माने, लातूर

Share this:

  • Facebook
  • X
Tags: एमबीएकुमार सप्तर्षीकोरोनानरेंद्र पवारपंतप्रधानबाजारशेतकरी आणि ग्राहक साखळीश्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी लि
Previous Post

पावनखिंड भाग – 12 बाजी प्रभू – इतिहास सन्मानाचा, अभिमानाचा, अतुल्य पराक्रमाचा

Next Post

ओळख महामंडळांची..! महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळ

Next Post
ओळख महामंडळांची..!  महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळ

ओळख महामंडळांची..! महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळ

ताज्या बातम्या

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

काय..? तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2025
0

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 23, 2025
0

व्हिएतनाम

व्हिएतनामींचा योगगुरू बनलाय साताऱ्यातील शेतकरीपुत्र?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 21, 2025
0

AI

500 कोटींच्या AI शेती धोरणाचा फायदा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 19, 2025
0

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

महाॲग्री- एआय

महाॲग्री- एआय धोरण मंजूर ; 500 कोटींची तरतूद

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.