• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

वंडर वर्ल्ड.. जाणून घेऊ या इजिप्तमधील सर्वांत पहिले.. सर्वांत मोठे व सर्वांत शेवटच्या पिरॅमिड तसेच या रहस्यमयी वास्तूबाबत…

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 17, 2021
in वंडरवर्ल्ड
0
वंडर वर्ल्ड.. जाणून घेऊ या इजिप्तमधील सर्वांत पहिले.. सर्वांत मोठे व सर्वांत शेवटच्या पिरॅमिड तसेच या रहस्यमयी वास्तूबाबत…
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

इजिप्त म्हटलं तर पटकन आपल्या डोळ्यासमोर येतात ते भव्य पिरॅमिड..! जगातील सर्वात रहस्यमयी वास्तू कोणती असेल तर ती वास्तू इजिप्तमध्ये असलेले पिरॅमिड आहेत, जे अनेक वर्षांपासून पर्यटकांचे आकर्षण बनलेले आहे. हे पिरॅमिड जितके भव्य आणि विलक्षण आहेत तेवढेच याबद्दल असलेले कुतूहल आणि रहस्य सुद्धा कमालीचे विलक्षण आहे..! ईश्वरी अंश मानण्यात आलेले इजिप्त देशाचे राजे आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या दफनांच्या जागा म्हणजेच हे पिरॅमिड्‌स होत. आजमितीला त्यावर प्रचंड संशोधन झालेले आहे आणि होत आहे. इ. स. पू. २६५० ते १५५० म्हणजे ११०० वर्षांमध्ये त्यांची उभारणी झाली. हजारो वर्षांपासून, इतिहासकार, आर्किटेक्ट आणि शास्त्रज्ञांनी या विशाल संरचनांच्या देखाव्यासाठी स्पष्टीकरण शोधण्याचा प्रयत्न केला आहे. आजपर्यंत, गूढ पूर्णपणे सोडवले गेले नाही आणि इतके अवाढव्य पिरॅमिड्स नेमके कसे बांधले गेले हे कोणालाही माहित नाही.

 

जोसेरचे पिरॅमिड हे इजिप्शियन पिरामिडचे अग्रदूत..

जोसेरचे पिरॅमिड हे इजिप्शियन पिरामिडचे अग्रदूत मानले जाते जे आजपर्यंत टिकले आहेत, जे प्राचीन इजिप्तमध्ये तयार केले गेले होते, ज्यात गिझा पठारावरील तीन पिरॅमिड्स – चीप्स, खेफ्रेन आणि मिककेरिन यांचा समावेश आहे. स्पष्ट कारणास्तव, पिरॅमिडच्या बांधकामाची नेमकी तारीख शोधणे अशक्य आहे, परंतु असे मानले जाते की हे प्राचीन राज्याच्या तिसऱ्या राजवंशाच्या पहिल्या फारोच्या कुटुंबासाठी दफन मंदिर म्हणून 2650 ई.स. मध्ये बांधकामाला सुरुवात झाली. या पिरॅमिडमध्ये सहा पायऱ्या आहेत, परंतु गरम कोरड्या वाळवंटातील वाऱ्याने त्याच्या तीक्ष्ण कडा फार पूर्वीपासून धुळीस मिळवल्या आणि लुटारू, विध्वंसक आणि अगदी सामान्य रहिवाशांच्या अनेक पिढ्या ज्यांना त्यांच्या स्वत: च्या घरांसाठी बांधकाम साहित्याची आवश्यकता होती, त्यांनी एकदाचे शानदार पॉलिश केलेले क्लॅडिंग काढून टाकले. या पिरॅमिडच्या बांधकामाचा आदेश इम्होटेपने 2650 मध्ये दिला होता. त्याने मल्टी-स्टेज पिरॅमिड बांधण्याचे आदेश दिले जेणेकरून जोसेरचा आत्मा थेट पृथ्वीवरून उठू शकेल या पायऱ्यांद्वारे स्वर्गात जाऊ शकेल. जोसेरचा पिरॅमिड हा सर्वात प्राचीन इजिप्शियन पिरॅमिड आहे, त्यामुळे दरवर्षी लाखो पर्यटक यात येतात. पिरॅमिडच्या आत, इम्होटेपने 11 दफन कक्ष बांधण्याचे आदेश दिले – जेणेकरून फारोच्या कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी पुरेसे असेल. जेव्हा पुरातत्वशास्त्रज्ञांनी पिरॅमिडच्या आतील खोल्या खोदल्या तेव्हा त्यांना फारोच्या बायका, त्याची मुले सापडली, परंतु जोसेरची ममी तेथे नव्हती. तसेच तेथील जवळजवळ सर्व दागिने आणि पवित्र वस्तू चोरीला गेल्या होत्या.

जळगावात मंगळवारी 19 ऑक्टोबरला अ‍ॅग्रोवर्ल्ड आयोजीत एकदिवसीय कुक्कुटपालन कार्यशाळा; प्रवेश मर्यादित..

अ‍ॅग्रोवर्ल्ड व आत्मा (नाशिक) तर्फे 23 ऑक्टोबरला नाशिकमध्ये एकदिवसीय दुग्धव्यवसाय कार्यशाळा; प्रवेश मर्यादित..

स्नेफ्रूने पिरॅमिडबाबत ‘आदर्श वस्तुपाठ’ घालून दिला

गिझा येथील काही पिरॅमिड्‌सची माहिती आपण करून घेऊ. इजिप्तच्या चौथ्या राजवटीतील राजा ‘स्नेफ्रू’ (इ. स. पू. २६८६-२६६७) याने सर्वांत प्रथम पिरॅमिड्‌स या प्रकारचे स्थापत्य निर्माण केले. त्याने एकूण तीन पिरॅमिड्‌स बांधले; पण त्यातल्या दोन वास्तूंत त्याला अपयश आले. पहिल्या पिरॅमिडमध्ये लाइमस्टोनचा वापर झाला होता; पण ते घसरू लागले आणि त्या वेळी त्यांचा नाद सोडण्यात आला. दुसऱ्या वास्तूला आज आपण ‘झुकलेला पिरॅमिड’ म्हणून ओळखतो. कारण त्याची वरची बाजू एका बाजूला थोडी झुकलेली आहे. स्नेफ्रूने एका मैलावर तिसऱ्या पिरॅमिडचे बांधकाम सुरू केले. त्यासाठी लाल रंगाचे लाइमस्टोन वापरल्यामुळे त्याला ‘लाल पिरॅमिड’ म्हणून ओळखले जाते. हाच जगातील यशस्वी ठरलेला पहिला खरा पिरॅमिड होय. शवपेटीतील ममी ठेवण्याची जागा (कक्ष), मृताचे मंदिर, खाद्यपदार्थ, मद्य आणि उपयुक्त मौल्यवान वस्तू ठेवण्याची जागा या सर्व बाबतीत स्नेफ्रूने ‘आदर्श वस्तुपाठ’ घालून दिला.

‘खुफू’चा जगातील सर्वांत मोठा गिझा पिरॅमिड

स्नेफ्रूचा मुलगा खुफू याने गिझातील सगळ्यात मोठा पिरॅमिड बांधला. इजिप्तच्या उत्तरेला नाईल नदीच्या पश्चिम किनाऱ्याला खडकाळ पठारावर उत्तरेला गिझाचा पिरॅमिड उभारण्यात आले. खुफूचा काळ होता इ.स.पू. २५७५-२५६६. तिथला ‘ग्रेट पिरॅमिड’ या नावाने ओळखला जाणारा तिघांतील एक पिरॅमिड हे खरोखरच बांधकामाचे मोठे आश्चर्य ठरले आहे. त्या कामाला वीस वर्षे लागली. एक लाख लोक त्यासाठी खपत होते. नाईल नदीला पूर आल्यानंतर शेती अशक्य असल्यामुळे बेकार झालेले ते लोक दर वर्षी तीन महिने (रोजगार हमी योजनाप्रमाणे..?) तिथे काम करत. त्या वेळी राजा कामगारांना उत्तम अन्न, वस्त्रे पुरवत असे.

 

पिरॅमिडच्या पायाच्या चारही बाजू प्रत्येकी ७५५ फूट लांबीच्या आहेत. या निमुळत्या होत जाणाऱ्या बाजू सुमारे ५१ अंशांत वळलेल्या आहेत. मुळातली उंची ४८१ फूट होती. ती आता ४५१ फूट झालेली आहे. पिरॅमिडसाठी सुमारे २३ लाख लाइमस्टोनचे घडवलेले दगड (घन) वापरण्यात आले. प्रत्येक दगडाचे वजन सरासरी अडीच टन होते. काही दगडांचे वजन तर सोळा टनांपर्यंतसुद्धा होते. आश्चर्य म्हणजे हे दगड इतके काटेकोरपणे तासून बसविले आहेत की त्यातून ब्लेडचे पातेदेखील जाऊ शकत नाही.

 

खाफ्रे राजाचे पिरॅमिड आणि स्फिंक्स

खाफ्रे (इ. स. पू २५५८-२५३२) राजाने बांधलेला पिरॅमिड वैचित्र्यपूर्ण होता. त्याला सूर्यदेवतेचे प्रतीक मानले जाई. काही ठिकाणी प्रचंड स्फिंक्स (सिंहाचे शरीर आणि मानवी मस्तक) दिसून येतात. त्यावरील स्फिंक्सचा चेहरा खाफ्रेच्या चेहऱ्याशी मिळताजुळता होता. दुर्दैवाने सरत्या वर्षांमध्ये या ‘ग्रेट पिरॅमिड’ची पडझड सुरू झाली. त्याची डागडुजी सुरू राहिली. इ. स. १३००मध्ये सुलतान मोहम्मद अन-नासीर याने स्फिंक्सचा विध्वंस केला. १७९८ मध्ये नेपोलियनच्या सैनिकांनी नेम धरण्यासाठी वापर केल्यामुळे स्फिंक्सचे नाक (शूर्पणखेप्रमाणे) नष्ट झाले. खाफ्रेच्या पिरॅमिडची मुळातील उंची २२८ फूट होती. त्यात खालच्या थरांसाठी लाल ग्रॅनाइट वापरला आहे, तर वरच्या बाजूला चमकता पांढरा लाइमस्टोन मुळात उपयोगात आणला होता. जुन्या काळानंतर प्राचीन इजिप्तच्या नव्या राजवटींमध्येही अधिक उत्तम प्रकारे, आकार आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने गौरवास्पद पिरॅमिड उभे होत राहिले. मधल्या काळातही (इ. स. पू. २०५५-१६५०) बांधकाम झाले होते. परंतु त्यासाठी मुख्यत: मातीच्या विटांचा वापर झाल्यामुळे पुढे त्यांचे ढिगारे बनले.

 

सर्वांत शेवटचे पिरॅमिड 18 व्या शतकात राजा आहमोझचे..

खुद्द इजिप्तमध्ये शंभरहून अधिक राजांशी संबंधित पिरॅमिड्‌स आहेत. त्यांच्या बांधकामासाठी अवाढव्य खर्च झालेला होता आणि ते सर्वांचे लक्ष वेधून घेत असल्यामुळे खजिन्याच्या आशेने चोरांच्या आकर्षणाला बळी पडत होते. सगळ्यात शेवटचा शाही पिरॅमिड अठराव्या राजघराण्यातील पहिला राजा आहमोझ (इ. स. पू. १५५० ते १५२५) याने बांधला. त्यानंतर मात्र इजिप्तच्या लोकांनी राजदफनासाठी पिरॅमिड नावाच्या अतिभव्य वास्तू बांधणे बंद केले.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: इजिप्तखाफ्रे राजाखुफूगिझा पिरॅमिडझुकलेला पिरॅमिडपिरॅमिडलाल ग्रॅनाइटस्नेफ्रूने पिरॅमिडस्फिंक्स
Previous Post

यशोगाथा – पाटील बंधूंचा दोन म्हशींपासूनचा प्रवास 425 लिटर दूध संकलनापर्यंत..; दूध व्यवसाय म्हणजे रोजचा रोख पैसा..; दुधाळ म्हैस कशी ओळखावी याबाबतही देतात सल्ले..

Next Post

अंडी उत्पादनात थंडीच्या दिवसात 40% घट होऊ शकते.. हे टाळण्यासाठी जाणून घ्या अंडी उत्पादनवाढीचे तंत्र…

Next Post
अंडी उत्पादनात थंडीच्या दिवसात 40% घट होऊ शकते.. हे टाळण्यासाठी जाणून घ्या अंडी उत्पादनवाढीचे तंत्र…

अंडी उत्पादनात थंडीच्या दिवसात 40% घट होऊ शकते.. हे टाळण्यासाठी जाणून घ्या अंडी उत्पादनवाढीचे तंत्र...

ताज्या बातम्या

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 16, 2025
0

गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप

आईसोबत तरुणाने सुरु केला गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप; आज 45 कोटींचा व्यवसाय !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 15, 2025
0

खान्देशातील धरणे फुल्ल

खान्देशातील धरणे फुल्ल; रब्बी “नो टेन्शन”; मका, भाजीपालासह रब्बी क्षेत्र वाढीचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन; निर्यातीसाठी दबाव

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

राज्यातून मान्सून माघारीला सुरुवात

राज्यातून मान्सून माघारीला सुरुवात; येत्या 24 तासात संपूर्ण महाराष्ट्रातून होणार एक्झिट – आयएमडी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 13, 2025
0

हवामान दुष्चक्र

हवामान दुष्चक्र: युरोपात उष्णतेच्या लाटेने घेतले 62 हजार बळी!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 11, 2025
0

हुश्श… रिटर्न मान्सून दोन दिवसात राज्यातून परतणार; अशी असेल वाटचाल – आयएमडी

हुश्श… रिटर्न मान्सून दोन दिवसात राज्यातून परतणार; अशी असेल वाटचाल – आयएमडी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 10, 2025
0

हवामान विभागा

आजचा दिवस पावसाचा! “या” जिल्ह्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट जारी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 9, 2025
0

Agriculture Minister Dattatray Bharane

Agriculture Minister Dattatray Bharane Receives Invitation for AgroWorld Agricultural Expo

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 8, 2025
0

विदर्भातील 30,000 शेतकऱ्यांना कर्जाच्या चक्रव्युहातून बाहेर येण्यास मदत करणारे स्टार्टअप

विदर्भातील 30,000 शेतकऱ्यांना कर्जाच्या चक्रव्युहातून बाहेर येण्यास मदत करणारे स्टार्टअप

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 8, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 16, 2025
0

गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप

आईसोबत तरुणाने सुरु केला गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप; आज 45 कोटींचा व्यवसाय !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 15, 2025
0

खान्देशातील धरणे फुल्ल

खान्देशातील धरणे फुल्ल; रब्बी “नो टेन्शन”; मका, भाजीपालासह रब्बी क्षेत्र वाढीचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन; निर्यातीसाठी दबाव

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish