मुंबई (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांसाठी ही आनंददायी बातमीे. खताच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ होऊ शकते, शेतकऱ्यांचा होणारा खर्च कमी करण्यासाठी सरकार खताच्या अनुदानात 62 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा विचार करत आहे. सध्या वाढलेल्या खताच्या किमतीमुळे खताच्या अनुदानात वाढ होऊ शकते. असा अनुमान सरकारने दिला आहे.
अनुदानामध्ये वाढ झाल्यावर खताचे दर खूप स्वस्त होईल. या वर्षी केंद्राकडून खतांसाठी 79530 कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले. यामध्ये 1 लाख 30 कोटी रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. अनुदानामध्ये वाढ झाल्यास खताच्या किंमती कमी होतील. या वर्षी सरकारकडून खतावर आतापर्यंत 21328 कोटी रुपयांच्या अतिरिक्त अनुदानाची घोषणा करण्यात आलीे.
नॉन-यूरिया खतांसाठी सरकारकडून अनुदान दिले जाणार –
खताच्या निर्मितीमध्ये नैसर्गिक गॅसचा सत्तर ते पंचाहत्तर टक्के वाटा असतो. नैसर्गीक गॅसच्या किमतीत या वर्षी तब्बल 50 टक्क्यांपर्यंत वाढ झाली. त्यामुळे खताच्या किमती देखील वाढल्या. नैसर्गीक गॅससोबत खतांच्या निर्मितीसाठी लागणारा कच्चामाल फॉस्फरस आणि अमोनियाचे दर देखील 40 ते 50 टक्क्यांनी वाढले आहेत. सरकारकडून खतांसाठी देण्यात येणारे हे अनुदान नॉन-यूरिया (Non-urea) खताना देण्यात येते.