केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे राज्याच्या माध्यमातून दहा हजार शेतकरी उत्पादक कंपन्या (FPC) करण्याची योजना राबविण्यात येत आहे. या योजनेला गती देण्यात येऊन शेतकरी उत्पादक कंपनी (FPC) योजना यशस्वी करण्याकरीता पीक पद्धती, कृषी विद्यापीठ, सेवाभावी संस्था यांच्या विविध कार्यक्रमांची सांगड घालावी. या शेतकरी उत्पादक कंपन्या केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात शेतकऱ्याला फायदा देणाऱ्या असाव्यात, असे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने समृद्ध करणार..
शेती किंवा शेती पूरक व्यवसाय गटाने केल्यास त्याचा सर्वांनाच लाभ मिळतो, हे लक्षात आले आहे. हाच दृष्टिकोन अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याचे कृषी विभागाचे धोरण आहे. त्यासाठीच केंद्राच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे राज्यात 10 हजार शेतकरी उत्पादक कंपनी (FPC) स्थापन करून त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हित जोपासले जाईल, असा विश्वास कृषिमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला.
FPC चा लाभ घ्यावा – कृषीमंत्री यांचे आवाहन
कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ गटशेती व शेतकरी उत्पादक कंपन्यांसह महिला शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने शेतकऱ्यांनी पूर्वतयारी करत मोठ्या प्रमाणात शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करून कृषी योजनांचा लाभ घ्यावा.
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच अॅग्रोवर्ल्डतर्फे जळगावात “फार्मर्स प्रोड्युसर कंपनी (FPC) – स्थापना ते व्यवस्थापन” यावर शनिवारी 2 ऑक्टोबरला एकदिवसीय कार्यशाळा..
FPC बाबत प्रश्न अनेक उत्तर मात्र एकच… अॅग्रोवर्ल्डतर्फे आयोजित FPC कार्यशाळा..
स्थळ – डीपीडीसी हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव…
दिनांक – 2 ऑक्टोबर 2021 (शनिवारी) वेळ – सकाळी 9.30 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत
नोंदणी शुल्क – प्रती प्रशिक्षणार्थी ₹ 1000/- (तज्ज्ञांचे मार्गदर्शन, चहा, नाष्टा, जेवण, लेखन साहित्य, प्रमाणपत्रासह..)
संपर्क –
9130091621 – हेमलता
9130091622 – वैशाली
www.eagroworld.in
आम्ही जाणतो नाती…
आम्ही जपतो विश्वास…
आम्ही आहोत… अॅग्रोवर्ल्ड..! 🌱