परतीच्या मान्सूनसाठी पोषक वातावरण
श्रावणझडीनंतर थोडी विश्रांती घेतलेला पाऊस या आठवड्यात पुन्हा जोमाने बरसणार असून हवामान खात्याने अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा जारी केलेला आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार आजपासून( दि. ११ सप्टेबर) मध्य महाराष्ट्र, कोकण व विदर्भात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडेल. उद्या (दि. १२ सप्टेबर) राज्यातील अनेक भागात अतिवृष्टीची शक्यता आहे. पुढील दोन तीन दिवस ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.
का आहे इशारा ?
राज्याची दक्षिण किनारपट्टी ते उत्तर केरळ दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून ते केरळच्या दिशेने सरकत आहे. तर अरबी समुद्राच्या पूर्वमध्य परिसर व कर्नाटकाची किनारपट्टी दरम्यान चक्रवाताची स्थिती आहे. त्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. येत्या रविवारी बंगाल उपसागराच्या पश्चिम मध्य भाग व आंध्रप्रदेश या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशच्या वायव्य भाग ते मध्य प्रदेशचा नैऋत्य भागात कमी दाबाचे क्षेत्र आहे. हे क्षेत्र पूर्व उत्तर प्रदेश त विदर्भाकडे सरकरण्याची शक्यता असून ते समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे. ही स्थिती ईशान्येकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
या भागात जास्त पाऊस
हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार मध्य महाराष्ट्र, कोकण त्याचबरोबर विदर्भात विजेच्या कडकडाटसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
फार छान, सुटसुटीत व सर्वांना समजेल अशी माहिती दिली जाते, त्यामुळे शेतकरी व शेतीसंबंधी कामात अचुक निर्णय घेणे शक्य होते व नुकसान टाळता येते.
धन्यवाद ????
किसान aqua ची ऍड टाकयचीय
Good Niuj
मला अग्रो वर्ल्ड फार आवडते शेती आणि शेतीपूरक जोड धंग्याची चांगली माहिती असते