पुणे/मुंबई : हवामान विभाग मुंबईच्या मान्सून अपडेट्सनुसार, कमी दाब क्षेत्राचा प्रभाव महाराष्ट्रातून कमी होतोय, अशी शक्यता आहे. आयएमडी पुणेचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी मात्र पुढे आणखी काही पावसाळ्याचे दिवस असतील असे म्हटले आहे. Agroworld Mansoon Updates Marathi
मान्सून अपडेट्स : कमी दाब क्षेत्र प्रभाव ओसरतोय
काही खासगी, प्रादेशिक अंदाज देणाऱ्या संस्थांच्या दाव्यानुसार, कमी दाब क्षेत्र प्रभाव चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, गोंदिया, भंडारा, बुलढाणा जिल्ह्यात; तसेच मराठवाडामध्ये पूर्णपणे कमी झालेला आहे. आज सायंकाळपासून अमरावती अकोला, वर्धा, नागपूर जिल्ह्यातील प्रभावसुद्धा कमी होईल. पुढील काही दिवस तुरळक भागांत सरी कोसळू शकतात; पण सार्वत्रिक पाऊस नसेल.
नवे चक्रीवादळ सक्रीय होण्याची चिन्हे
आधीच्या मान्सूनच्या सक्रियतेचा जोर महाराष्ट्रात किनारपट्टी व घाट क्षेत्र वगळता काहीसा कमी होत आहे. मात्र, आयएमडीने पुढील 3 दिवस गुजरात, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, ओडिशा, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान खात्याचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा म्हणाले, की ओडिशामध्ये मुसळधार पावसाच्या सर्वाधिक हालचाली होण्याची शक्यता आहे, कारण 17-18 सप्टेंबरच्या सुमारास बंगालच्या उपसागरावर नवीन चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे.
नागपूरची उडालेली दैना,राज्यातील पाऊस स्थिती, कुठे कोणता ॲलर्ट ते इथे क्लिक करून जाणून घ्या
- स्कायमेट वेदरच्या रिपोर्टनुसार, गेल्या 9 तासात विदर्भातील गोंदियात 120 मिमी मुसळधार पाऊस झाला. नागपुरात 67 मिमी नोंद झाली. नव्या हवामान बदलांमुळे दक्षिण मध्यप्रदेश, महाराष्ट्र, दक्षिण राजस्थान आणि गुजरातच्या अनेक भागात मुसळधार पाऊस होईल.
यावर्षी 1,590 मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाल्याने, भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अधिकाऱ्यांनी 2017 च्या तुलनेत 2022 हे सर्वात पाणीदार वर्ष असेल, असा अंदाज वर्तवला आहे.
आयएमडी पुणेचे प्रमुख होसाळीकर म्हणतात, 13 सप्टेंबरच्या ताज्या निरीक्षणावरून मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई, पुणे, नाशिक घाट भागात पुढील 3-4 तासांत मधून-मधून तीव्र सरीसह, मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. सकाळी 7.30 वाजताच्या नवीनतम रडार निरीक्षणावरून हे दिसून आले आहे. मात्र, पुढे पावसाळ्याचे दिवस आहेतच.
मुंबईचा हवामान अंदाज Weather Updates
मुंबई शहर व उपनगरात आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. काही ठिकाणी संध्याकाळी, रात्री गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
भरती : दुपारी : 1. 38 वा (4.47 मीटर)
ओहोटी : सायंकाळी : 7:49 वा (0.51 मीटर)
👆 गेल्या 24 तासात मुंबई, ठाण्यात मुसळधार
मुंबई, ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरात गेल्या 24 तासात (13 सप्टेंबर सकाळी 8 वाजेपर्यंत) मध्यम ते जोरदार पाऊस झाला. काल संध्याकाळपासून ते रात्रीपर्यंत बहुतेक ठिकाणी पावसाचा जोर राहिला. कुलाब्यातील 59.2 मिमी, तर सांताक्रुझ येथे 93.4 मिमी पाऊस झाल्याचे आयएमडी, मुंबईने सांगितले. याचा प्रभाव मुंबई ठाण्यात तास पाणी साचणे, वाहतूक कोंडी असा दिसून आला.
13 सप्टेंबर, सकाळी 7.45 वाजेची उपग्रह स्थिती : पुढील 4.5 तासांत महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगडसह मध्य भारताच्या काही भागांत मध्यम ते तीव्र पाऊस पडण्याची शक्यता आहे. सक्रिय मान्सूनची स्थिती कोकण, घाट परिसर आणि आसपास राहील..
Comments 1