मुंबई – वातावरणात अचानक झालेल्या बदलांमुळे राज्याच्या काही भागाला अवकाळी पावसाचा फटका बसणार आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढच्या दोन दिवसात पुणे जिल्हा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 18 ते 20 मार्च दरम्यान मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
यासंदर्भात प्रादेशिक हवामान केंद्राने (मुंबई) ट्विट करून माहिती दिली आहे. ‘मध्यम-स्तरीय पश्चिमेकडील वारे आणि खालच्या स्तराच्या पूर्वकडील वाऱ्याच्या आंतरक्रियेच्या प्रभावाखाली, 18 ते 20 मार्च 2021 दरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडामध्ये मेघ गर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भात मेघ गर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता आहे.’ अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.