महाराष्ट्रातील जनतेचे श्रद्धास्थान असलेल्या किल्ले रायगडावर सुरु असलेल्या उत्खनन कामात शुक्रवारी अनमोल असा ठेवा सापडला आहे. येथे असलेल्या उत्खन्नाच्या या कामामध्ये सुमारे ३५० वर्षांपूर्वीची अडीच तोळे वजनाची नक्षीदार सोन्याची बांगडी आढळल्याने महाराष्ट्राच्या सुवर्ण इतिहासाला नवा उजाळा मिळाला आहे.
किल्ले रायगडाच्या विकासासाठी सुमारे चार वर्षांपूर्वी रायगड प्राधिकरण समितीमार्फत किल्ल्यावरील सुमारे साडेतीनशे ठिकाणांचे उत्खन करण्यात येणार आहे. याचाच भाग म्हणून पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली उत्खनन करण्यात येत असून, यामध्ये गेल्या काही वर्षात शिवकालीन शस्त्रांचे अवशेष, नाणी आणि काही अत्यंत दुर्मिळ अशा पुरातन वस्तू आणि वास्तुंचे अवशेष आढळून आले आहेत. रायगडावर सुरू असलेल्या उत्खन्नाच्या या कामामध्ये छोटी निरांजनं देखील सापडली आहे.
येथे सुरु आहे उत्खनन
किल्ले रायगड येथे जगदीश्वर मंदीराशेजारी असलेल्या एका वाड्याचे उत्खनन सुरु असून त्याच ठिकाणी सोन्याची नक्षीदार बांगडी सापडल्याने इतिहासाचा मोठा खजिना सापडला आहे. मागील गेल्या दोन महिन्यांपूर्वी कानातल्या रिंगादेखील आढळून आले आहे.
रायगडावर आढळलेल्या या अनमोल खजिन्यामुळे भविष्यात अनेक ऐतिहासिक खजिना समोर येण्याची शक्यता आहे. पुरातत्व विभागाच्या उत्खननाच्या नियमानुसार किल्ले रायगडावरील ३५० ठिकाणचे उत्खनन केले जाणार आहे. यापूर्वी, किल्ले रायगडावरील उत्खन्नात शिवकालीन सोन्याचं नाणं , बंदुकीची गोळी, तोफेचे अवशेष, नक्षीदार मातीची मटकी, चीनीमातीच्या भांडीची तुकडे, विटा आणि कौलै, तोफगोळे अशा ऐतिहासिक वस्तू आढळून आल्या आहेत.
सौजन्य – समाजमाध्यम