• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

मशरूम शेतीमुळे खुलले भाग्य

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 31, 2022
in यशोगाथा
0
मशरूम शेतीमुळे खुलले भाग्य
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

बाराबंकीच्या शेतकर्‍यांनी मर्यादित साधनांमध्ये मिळवला नफा
भारतात सध्या मशरुम उद्योगाला मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध झाल्या आहेत. मशरुमला काही भागात आळिंबी देखील म्हटले जाते. मशरुमची योग्य पद्धतीने लागवड केल्यास चांगले उत्पन्न मिळवता येते, हे उत्तरप्रदेशातील बाराबंकी, मनरखापूर गावातील शेतकर्‍यांनी सिद्ध करुन दाखवले आहे. आपल्या पारंपरिक शेतीसोबतच मशरूमची लागवड करून अनेक शेतकरी दुप्पट नफा कमवत आहेत. या गावातील जवळपास सर्वच शेतकर्‍यांनी उपलब्ध मर्यादित साधनांच्या सहाय्याने मशरुमच्या व्यवसायात प्रगती साधली आहे.

 

सद्यःस्थितीत मशरुमला बाजारपेठेत कमालीची मागणी आहे. मागणीनुसार मशरुमचे पाहिजे त्या प्रमाणात उत्पादन होताना दिसत नाही. त्यामुळे शेतकरी आता मशरुमच्या लागवडीकडे वळत आहेत.
कमी जागेत जास्तीत जास्त फायदा देणारी ही शेती अनेक शेतकर्‍यांच्या उत्पन्नाचे साधन ठरत आहे. सुरुवातीला मशरूमची लागवड करणार्‍या शेतकर्‍यांच्या आर्थिक स्थितीत झालेली सुधारणा पाहता मोठ्या संख्येने शेतकर्‍यांनी त्याचा अवलंब केला. उत्तरप्रदेशातही मशरुमची शेती करणार्‍यांची संख्या वाढत आहे. बाराबंकी जिल्ह्यापासून सुमारे 30 किलोमीटवर असलेल्या दूर सिद्दौर ब्लॉकमधील मनरखापूर गावात राहणारे विनय वर्मा हे तरुण शेतकरी वयाच्या गेल्या 15 वर्षांपासून मशरूमची लागवड करीत आहेत. विनय यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या जवळच्या गावात 1993 साली मशरूमची लागवड सुरू झाली. हळूहळू जेव्हा त्यात फायदे दिसू लागले तेव्हा आमच्या गावातही त्याची सुरुवात झाली. आज गावातील सर्व लोक गहू, भातासोबत मशरूमची लागवड करतात. यंदा आपण 75 क्विंटल स्ट्रॉमध्ये मशरूमची लागवड केली आहे. ज्यातून 40 क्विंटल मशरूम तयार होतील व त्याची बाजारात लाखो रुपये किंमत असेल, असा विश्वास विनय शर्मा यांना आहे.

 

छोट्या दुकानातूनही विक्री
उत्तरप्रदेशातील मानराखा गावात सुमारे 200 घरे आहेत. यापैकी 100 कुटुंबे पारंपारिक शेती करताना गव्हासह इतर धान्यवर्गीय पिकांचे उत्पादन घेतात. हे शेतकरी आता इतरांचे पाहून मशरूमची लागवड करीत आहेत. बाजारपेठेत मशरुमला जास्त मागणी असल्याने व अपेक्षित उत्पादन होत नसल्याने मशरुमची चांगल्या दराने विक्री होते. शहरी आणि ग्रामीण भागातील बहुतांश लोकांना मशरूम अधिक आवडू लागली आहे. अनेक राज्यांमध्ये भाजीच्या छोट्या दुकानातही मशरूमची विक्री मोठ्या प्रमाणावर केली जाते.

कंपनीच केली स्थापन
मनरखा गावातील शिवा द्विवेधी या 23 वर्षीय शेतकर्‍याने सांगितले, की त्यांच्या गावातील लोकांच्या प्रेरणेने त्यांनी मशरूमची लागवड सुरू केली. आज त्यांना यातून चांगला फायदा होत आहे. पारंपरिक पद्धतीने केल्या जाणार्‍या भातशेतीसाठी पाच हजारांहून अधिक खर्च येतो आणि नफाही तेवढाच असतो. मात्र, मशरूमचे उत्पादन घेताना एकूण दीड लाख रुपये खर्च आला व सहा महिन्यांत पाच लाख रुपयांपर्यंत कमाई झाली. यावेळी 200 क्विंटलची लागवड केली असून सुमारे अडीच लाख रुपये खर्च झाले आहेत. सध्याच्या बाजारातील दरानुसार, आपल्याला सुमारे साडेसात लाख रुपयांचा नफा मिळेल असा द्विवेधी यांना विश्वास आहे. त्यांच्या गावातील शेतकर्‍यांनी उत्पादीत केलेला मशरूम गोरखपूर, फैजाबाद, बस्ती, देवरिया, कानपूर, सीतापूर, लखीमपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये विकला जातो. मशरुम विक्रीच्या या व्यवहारात थेट शेतकर्‍यांनाच त्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी त्यांनी कंपनीचीही स्थापना केली आहे. या कंपनीच्या माध्यमातून शेतकरी थेट लोकांना मशरूम विकून नफा कमावतात. बाजारात मशरूमचे दर वाढतच असल्याने त्याचा शेतकर्‍यांनाच लाभ होत असल्याचे द्विवेधी सांगतात.

 

मशरुमचे औषधी उपयोग
मधुमेही व्यक्तींकरिता मशरुम उपयुक्त आहे. ज्यात जास्त प्रथिने व कमी ऊर्जा आहे. अशा प्रकारच्या अन्नाची गरज मधुमेही व्यक्तींना असते. मशरूममध्ये रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करणारे घटक आहेत. याशिवाय मूत्रपिंड (किडनी) रोग्यांचा जीवनकाळ वाढविण्यासही मशरुम उपयुक्त ठरतात. त्यात कमी उर्जा, प्रथिने, जीवनसत्वे व तंतुमय पदार्थ असल्याने लठ्ठ व्यक्तींसाठी ते फायदेशीर ठरते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी देखील मशरुमचा उपयोग होतो. मशरूमचे नियमित सेवन केल्यास स्कर्व्ही रोगापासून बचाव होऊ शकतो. मशरूममध्ये तंतुमय पदार्थ व फॉलिक अ‍ॅसिड असल्याने शरीरातील पचनक्रिया सुरळीत ठेवण्याचे काम मशरुममुळे चांगल्या प्रकारे होते.

बटन मशरुमची लागवड
मशरूममध्ये बटण मशरुमला चांगली मागणी आहे. त्याची लागवड करून शेतकरी केवळ चार महिन्यांत दुप्पट खर्चाचा लाभ सहज घेऊ शकतात. भारतात बटन मशरूम पिकवण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हा कालावधी सर्वोत्तम आहे. या सहा महिन्यांत दोन पिके घेतली जातात. मनारखा गावातील सोनू कुमार या तरुण शेतकर्‍याने स्वतःच्या अनुभवानुसार सांगितले, ते सुमारे दहा वर्षांपासून शेती करीत आहते. ऑगस्ट ते फेब्रुवारी या कालावधीत मशरुमची लागवड केल्यानंतर त्याच्या विक्रीतून चांगले उत्पन्न मिळाले. मशरूम पिकवण्यासाठी बाहेरून काहीही लागत नाही. आम्ही या व्यवसायासाठी आपली देशी जुगाड पद्धतच वापरली आहे. ज्यामध्ये आमचा अनावश्यक खर्चही वाचत असल्याचे सोनू कुमार यांनी सांगितले.
मर्यादित साधनांमध्ये मशरूमची लागवड करून शेतकरी चांगला नफा कमावत आहेत.

कृषी विज्ञान केंद्राचे सहकार्य
सहारनपूर जिल्ह्यातील रामपूर मनिहार ब्लॉकमधील मदानुकी गावातही बारापेक्षा अधिक शेतकर्‍यांनी मशरूमची लागवड सुरू केली आहे. या गावातील मदनुकी गावातील शेतकरी सत्यवीर सिंग यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या मदतीने 2009 मध्ये मशरूमची लागवड सुरू केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2009 मध्ये त्यांनी छोटी झोपडी बांधून मशरूमची लागवड सुरू केली होती. आज ते वर्षाला सुमारे 6 हजार पिशव्या बटण मशरूम आणि 8 हजार पिशव्या ऑयस्टर मशरूमची विक्री करतात.

अशी घ्यावी काळजी
मशरूमसाठी योग्य हवामान असणे खूप महत्वाचे आहे. हवामान खराब असल्यास त्याचा थेट परिणाम उत्पादनावर होतो. मशरूमसाठी 18 ते 28 अंशांचे तापमान योग्य ठरते.

Share this:

  • Facebook
  • X
Tags: Agriculture Science CenterFarmersMushroom Farmingआळिंबीकृषी विज्ञान केंद्रमशरूम शेतीशेतकरीस्कर्व्ही
Previous Post

अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी खत अनुदानात वाढ होण्याची शक्यता… शेतकऱ्यांना मिळू शकतो मोठा दिलासा

Next Post

मल्चिंग पेपरच्या वापरातून वाढतेय कांद्यांचे उत्पादन… जाणून घ्या सविस्तर माहिती

Next Post
मल्चिंग पेपरच्या वापरातून वाढतेय कांद्यांचे उत्पादन… जाणून घ्या सविस्तर माहिती

मल्चिंग पेपरच्या वापरातून वाढतेय कांद्यांचे उत्पादन… जाणून घ्या सविस्तर माहिती

ताज्या बातम्या

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

काय..? तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2025
0

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 23, 2025
0

व्हिएतनाम

व्हिएतनामींचा योगगुरू बनलाय साताऱ्यातील शेतकरीपुत्र?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 21, 2025
0

AI

500 कोटींच्या AI शेती धोरणाचा फायदा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 19, 2025
0

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

महाॲग्री- एआय

महाॲग्री- एआय धोरण मंजूर ; 500 कोटींची तरतूद

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.