• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

बजाज अलियान्झ कंपनीने शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा नुकसान भरपाई द्यावी, या मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाकडून स्थगित

सुप्रीम कोर्टाचा बजाज अलियान्झ कंपनीला दिलासा मात्र दीड महिन्यात 200 कोटी जमा करण्याचे आदेश.

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2022
in हॅपनिंग
0
बजाज अलियान्झ कंपनीने शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा नुकसान भरपाई द्यावी, या मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाकडून स्थगित
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

नवी दिल्ली : बजाज अलियान्झ कंपनीने अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील साडेतीन लाख शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा नुकसान भरपाईपोटी 400 कोटी रुपये अदा करावेत, या मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने गुरुवारी स्थगिती दिली. सुप्रीम कोर्टाने बजाज अलियान्झ कंपनीला दिलासा दिला असला तरी न्यायमूर्ती जे.के. माहेश्वरी आणि हिमा कोहली यांच्या खंडपीठाने कंपनीला दीड महिन्याच्या आत 200 कोटी रुपये कोर्ट रजिस्ट्रारकडे जमा करण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई हायकोर्टाने सहा मे रोजी शेतकऱ्यांना दीड महिन्यांच्या आत नुकसाभरपाई अदा करण्याचा आदेश दिला होता.

 

 

कंपनीने पैसा जमा केला नाही तर…

खंडपीठाने स्पष्ट केले आहे, की सहा आठवड्यांच्या आत बजाज अलियान्झ कंपनीने जर 200 कोटी रुपये जमा केले नाही, तर मुंबई हायकोर्टाच्या निकालाला दिलेली स्थगिती आपोआप संपुष्टात येईल. कंपनीच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार, राज्याचे कृषी आयुक्त, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी आणि शेतकरी याचिकाकर्त्यांना नोटीस बजावली आहे. बजाज अलियान्झ कंपनीविरोधात उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यानंतर राज्यभरातील शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई दावे एकत्रित केले गेले होते. या भरपाईपोटी एकूण आर्थिक दायित्व अंदाजे ₹ 400 कोटींपेक्षा जास्त असेल, असे कंपनीने कोर्टात सांगितले. या भरपाईत कंपनी उद्ध्वस्त होईल, असा युक्तीवाद केला गेला. मात्र, याचिकाकर्त्यांनी प्रीमियमपोटी कंपनीने 500 कोटींहून अधिक रक्कम प्राप्त केल्याची बाब यापूर्वीच हायकोर्टाच्या निदर्शनास आणून दिली होती.

 

 

72 तासात आत दावे न केल्याचा युक्तीवाद

मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात, बजाज अलियान्झने 18 मे रोजी, सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. प्रधानमंत्री फसल विमा योजना (पीएमएफबीवाय) अंतर्गत विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नाकारण्यात आल्याचे कंपनीने आपली बाजू मांडताना सुप्रीम कोर्टात मान्य केले. शेतकऱ्यांनी नियमानुसार 72 तासांच्या आत नुकसान भरपाई दावे नोंदवले नाहीत म्हणून दावे नाकारले गेल्याचे कंपनीने सांगितले.

 

 

मुदतीत दावे केलेल्यांनाच भरपाईच्या मुद्द्याकडे हायकोर्टाचे दुर्लक्ष

बजाज अलियान्झ कंपनीची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील विवेक टंखा यांनी दावा केला की, ज्या शेतकऱ्यांनी 72 तासांच्या मुदतीचे पालन केले तेच विमा दाव्यासाठी पात्र आहेत, याकडे उच्च न्यायालयाने दुर्लक्ष केले. दावे निकाली काढण्यासाठी सर्वांगीण निर्देश देताना हायकोर्टाने पीएमएफबीवाय नव्हे तर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीची मार्गदर्शक तत्त्वे लागू केली. पिकांचे नुकसान होऊन 20 महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे; नुकसानीचे मोजमाप कसे करावे, असा सवालही सुप्रीम कोर्टातील युक्तिवादात करण्यात आला.

 

सुप्रीम कोर्टाने खडसावले

गेल्या वर्षी 5 मार्च रोजी महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या दाव्यांसंदर्भात मंजुरीचे पत्र बजाज अलियान्झ कंपनीला लिहिले होते, याकडे खंडपीठाने लक्ष वेधले. “आदेश मिळाल्यानंतर तुम्ही काय केले? तुम्ही या आदेशाला आव्हान न देता तो स्वीकारला,” हे सुप्रीम कोर्टाने कंपनीच्या ध्यानात आणून दिले.

 

फक्त 87 कोटींची भरपाई अदा

उच्च न्यायालयात शेतकऱ्यांच्या वतीने याचिका दाखल करणाऱ्या वकिलांचे प्रतिनिधी, अधिवक्ता सुधांशू चौधरी यांनी नुकसान भरपाईची रक्कम ₹ 450 कोटींपेक्षा जास्त असल्याचा दावा केला. कंपनीला विमा योजना अंतर्गत ₹ 500 कोटींहून अधिक प्रीमियम प्राप्त झाल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, कंपनीने दाव्यांच्या वितरणात फक्त 72,325 शेतकर्‍यांना केवळ ₹ 87.83 कोटी देऊन तांत्रिक कारणास्तव इतर बहुतांश दावे नाकारले, हेही त्यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले.

 

72 तासांत कंपनीला माहिती देणे अशक्य

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी यापूर्वीच हायकोर्टात सांगितले होते की, चक्रीवादळ आणि पावसामुळे या भागातील दूरध्वनी सुविधा ठप्प होत्या. त्यामुळे 72 तासांच्या आत विमा कंपनीला त्यांच्या नुकसानीची माहिती देणे अशक्य होते. त्यांनतर राज्य सरकारने नुकसानीचे मूल्यांकन केले. मात्र, बजाज अलियान्झ कंपनीने मार्च 2021 च्या सरकारी आदेशाची अंमलबजावणी करण्यास नकार दिला.

 

शेतकऱ्यांचा युक्तीवाद हायकोर्टाने धरला ग्राह्य

मुंबई हायकोर्टाने शेतकऱ्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरला होता. विमा कंपनीला 72 तासांच्या आत माहिती देण्याची सक्ती नसल्याचे हायकोर्टाने नमूद केले होते. आपत्तीनंतर लगेचच शेतकर्‍यांना त्यांच्या शेतात जाऊन नुकसानीचे मूल्यांकन करणे अशक्य होते, हे कोर्टाने मान्य केले होते.

Supreme Court stays Mumbai Highcourt order directing Bajaj Allianz to clear farmers crop insurance compensation claims.

 

Share this:

  • Facebook
  • X
Tags: Bajaj AllianzBombay HighcourtCompensationCrop InsuranceMaharashtra.OsmanabadSupreme Courtउस्मानाबादनुकसान भरपाईपीक विमाप्रधानमंत्री शेतकरी विमा योजनाबजाज अलियान्झमहाराष्ट्रमुंबई हायकोर्टसर्वोच्च न्यायालयसुप्रीम कोर्ट
Previous Post

हरियाणामध्ये साकारली जातेय आशियातील सर्वात मोठी बागायती फळभाज्या दूध, पोल्ट्री बाजार समिती; 14 राज्यातील शेतकऱ्यांना होणार फायदा

Next Post

पावसाळ्यात पशुपालकांनी जनावरांची घ्यावयाची काळजी

Next Post
पावसाळ्यात पशुपालकांनी जनावरांची घ्यावयाची काळजी

पावसाळ्यात पशुपालकांनी जनावरांची घ्यावयाची काळजी

ताज्या बातम्या

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मान्सून अंदमानात

मान्सून अंदमानात… पुढील प्रवास कसा असणार ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

IMD

IMD – जळगाव, नाशिकसह या जिल्ह्यांना यलो अलर्ट !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 13, 2025
0

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025 मध्ये ‘कॅन बायोसिस’ ला ज्युरी विशेष पुरस्कार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 30, 2025
0

तांत्रिक

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 25, 2025
0

जगाच्या पाठीवर

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मान्सून अंदमानात

मान्सून अंदमानात… पुढील प्रवास कसा असणार ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.