प्रधानमंत्री मुद्रा योजना ( :Pradhan Mantri Mudra Yojana (PMMY)) २०१५ -१६ च्या अर्थसंकल्पानुसार २०००० कोटी रुपयांची गुंतवणूक करून मुद्रा बॅंक उभारण्याची घोषणा करण्यात आली , बॅंकेअंतर्गत ३००० कोटी रुपयांचा पतहमी निधी उभारण्याची घोषणा करण्यात आली . मुद्रा बॅंकेची कंपनी म्हणून मार्च २०१५ मध्ये कंपनी कायदा २०१३ अंतर्गत आणि गैरबॅंकिंग वित्तीय कंपनी म्हणून ७ एप्रिल २०१५ ला रिझर्व्ह बॅंक कायदा १९३४ अंतर्गत नोंदणी करण्यात आली मुद्रा ही एक सुक्ष्म एककांच्या विकास व पुनर्वित्तपुरवठ्यासाठी भारत सरकारने स्थापित केलेली नविन संस्था आहे.या योजनेची घोषणा, २०१६च्या केंद्रीय अंदाजपत्रकामध्ये अर्थमंत्र्यांनी केली. या मुद्रा योजनेचा उद्देश {नॉन-कॉर्पोरेट} नवीन सामुदायिक लघु व्यावसायिक क्षेत्रास वित्त पुरवठा करणे असा आहे.[१] प्रधानमंत्री मुद्रा योजनेत रु. एक लाख करोड पर्यंत छोट्या व्यावसायिकांना कर्ज मंजूर करण्यात आले असे प्रधानमंत्री म्हणाले.त्यांनी यावर जोर दिला कि तरुणांनी रोजगार देण्याची तयारी ठेवावयास हवी न कि रोजगार मागण्याची.
या योजनेच्या लाभार्थ्यांना भरावा लागणारा व्याजाचा दर हा सुमारे 8.40% ते 12.45% एवढा आहे.
उद्देश
या योजनेअंतर्गत तीन वर्ग तयार करण्यात आले आहेत:
- शिशू :- ५०,००० ) पर्यंत कर्ज
- किशोर :- ५०,००० ते 5 लाख पर्यंत कर्ज
- तरुण :- 5 लाख च्या वर पण, 10 लाख पेक्षा खाली, पर्यंत कर्ज
प्रधानमंत्री मुद्रा योजना २०२० मध्ये कसा अर्ज करावा? पंतप्रधान मुद्रा योजनेंतर्गत आपला उद्योग सुरू करण्यासाठी जर तुम्हाला बँकेकडून कर्ज घ्यायचे असेल तर तुम्हाला खाली दिलेली पद्धत वापरावी लागेल.- सर्वप्रथम, या योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी अर्जदारास संबंधित बँकेकडून अर्ज भरावा लागेल.
- त्यानंतर, अर्ज, जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार कार्ड नंबर इ. मध्ये मागितलेली सर्व माहिती भरावी लागेल आणि सर्व कागदपत्रे संबंधित बँकेत जमा करावी लागतील.
- त्यानंतर, बँक अधिकारी आपला अर्ज आणि सर्व कागदपत्रे आणि कर्जाची रक्कम 1 महिन्याच्या आत आपल्या बँक खात्यात पाठविली जाईल.
- अशा प्रकारे आपला अर्ज पूर्ण होईल आणि आपण प्राप्त कर्जाच्या रकमेसह आपला उद्योग सुरू करण्यास सक्षम असा
माहिती स्रोत -wikipedia
Plz. Cantac no i problem. Proses. Plz. Help