आपले पॅनकार्ड (PAN CARD) आधारकार्डाशी (Aadhar card) लिंक (link) करणे हे गरजेचे (mandatory) आहे, त्यामुळे सर्वांनी याचे महत्व समजून घेत हे काम पूर्ण केले आहे. मात्र अद्याप अनेक लोक असे आहेत ज्यांनी पॅनकार्ड आधारकार्डाशी लिंक केलेले नाही. अशा लोकांसाठी हे काम करण्याची मुदत आता ३१ मार्च २०२१ पर्यंत वाढवण्यात आली आहे. जर या तारखेपर्यंत हे काम पूर्ण झाले नाही तर १० हजारांचा दंड (fine) भरावा लागू शकतो. सरकारच्या आकडेवारीनुसार (government statistics) अद्याप १८ कोटी पॅनकार्डधारक असे आहेत ज्यांनी आधारकार्ड लिंक केलेले नाही. यामुळे आपले पॅनकार्ड अवैध (illegal) ठरवले जाऊ शकते.
होऊ शकतो १० हजारांचा दंड
पॅनकार्ड आधारकार्डाशी लिंक करण्याचे काम ३१ मार्च २०२१पर्यंत पूर्ण केले गेले नाही तर आयकर कायद्याच्या तरतुदींनुसार आपल्यावर १० हजारांचा दंड लावला जाऊ शकतो. सरकारी निर्देशांनुसार पॅनकार्ड हे आधारकार्डाशी लिंक करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
लिंक न केल्यास पॅनकार्ड निष्क्रीय होणार
कर विभागाच्या माहितीनुसार जर ३१ मार्च २०२१पर्यंत लिंक न केलेल्या पॅनकार्डाचा वापर करताना कोणी आढळून आले तर त्याच्यावर आयकर कायद्याच्या कलम २७२Bअंतर्गत दहा हजारांचा दंड लावला जाऊ शकतो. कर विभागाने म्हटले होते की ३१ मार्च २०२१पर्यंत करदाते किंवा पॅन आणि आधारकार्ड लिंक न झाल्यास पॅनकार्ड निष्क्रीय होईल. सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर २०१८मध्ये आधारकार्ड संवैधानिकरित्या वैध घोषित केले होते आणि म्हटले होते की इन्कम टॅक्स रिटर्न्स दाखल करण्यासाठी आणि पॅनकार्डच्या वितरणासाठी बायोमेट्रिक आयडी अनिवार्य असेल.
असे लिंक करा पॅनकार्ड आणि आधारकार्ड
जर आपण अद्याप आपले आधारकार्ड आणि पॅनकार्ड लिंक केले नसेल तर https://www.incometaxindiaefiling.in/ या संकेतस्थळावर जा आणि लिंक करण्यासाठी आपले तपशील भरा. पॅन आणि आधार जोडण्यासाठी आणखी एक मार्ग आहे. यासाठी आपल्याला ५६७६७८ किंवा ५६१६१ या क्रमांकावर मेसेज पाठवावा लागेल. हे पाठवताना लक्षात ठेवा की मेसेज याच फॉर्मॅटमध्ये असावा- UIDPAN12digitAadhar>10digitPAN|
सौजन्य:- समाज माध्यम